अयोध्येत २२ जानेवारी, २०२४ रोजी भव्य अशा राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या तयारीने वेग घेतला आहे. प्राणप्रतिष्ठापनेनंतर ४८ दिवसांपर्यंत मंडल पूजा केली जाणार आहे. देशभरातील विविध भागांत रामभक्त त्यांच्या त्यांच्या पद्धतीने रामाप्रति श्रद्धा व्यक्त करतील. या पार्श्वभूमीवर एटा जिल्ह्यातून रामलल्लाच्या दरबारात अष्टधातूने बनलेला २१०० किलोची घंटा पाठवली जाणार आहे.
मंदिरांत आतापर्यंत लावण्यात आलेल्या घंटांपैकी ही सर्वांत मोठी घंटा असेल, असा दावा केला जात आहे. ही घंटा बनवण्यासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सुमारे ४०० श्रमिकांनी या घंट्याची निर्मिती केली आहे. गेल्या एक वर्षापासून जलेसरच्या मित्तल कारखान्यात ही घंटा बनवली जात होती. २१ किलोची ही घंटा बनवण्यासाठी कारागीर दिवसरात्र काम करत होते. अष्टधातूने बनलेली ही घंटा डिसेंबरच्या अखेरपर्यंत अयोध्येतील राम मंदिरात पोहोचेल.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीर; दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान हुतात्मा!
जय श्रीराम म्हणत शबनम शेख निघाली अयोध्येला
प्राग विद्यापीठात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १३ जणांचा मृत्यू
विजय वडेट्टीवार म्हणतात, जितेंद्र आव्हाड भांबावलेत
श्रमिकांनी दिवस-रात्र राबून ही घंटा तयार केली आहे. यासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या घंट्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही कळवण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जेव्हा याची तारीख कळवली जाईल, तेव्हा या घंटेला अयोध्येला पोहोचवले जाईल. राम मंदिर समितीचे सदस्यही संपर्कात आहेत. घंट्याची रुंदी १५ फूट आणि आतली रुंदी पाच फूट आहे. ही घंटा बनवण्यासाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागला आहे.
२१०० किलोची ही घंटा सहा फूट उंच आणि पाच फूट रुंद आहे. घंटा घुंघरू-घंटी नगरीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जलेसरमध्ये या घंटेची निर्मिती करण्यात आली आहे.