24 C
Mumbai
Thursday, May 8, 2025
घरविशेषदर्गा तोडल्यानंतर झालेल्या दगडफेकीत २१ पोलिसांचे हातपाय मोडले

दर्गा तोडल्यानंतर झालेल्या दगडफेकीत २१ पोलिसांचे हातपाय मोडले

जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार

Google News Follow

Related

नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेल्या दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी म्हणून पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. त्यावेळी मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला. या दगडफेकीत काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलिसांचा रुग्णालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत २१ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील काही पोलिसांच्या हाताला दुखापत झाली आहे, तर काहींच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या डोक्यालाही दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. काठेगल्लीमध्ये रात्री ५०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी ४०० पेक्षा जास्त लोकांचा जमाव एकाचवेळी आला आणि जमावाने आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली.

दरम्यान दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास स्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या सिग्नल जवळ असलेल्या बेकायदेशीर दर्ग्याचे बांधकाम सकाळी महापालिकेच्या मदतीने शांततेत हटवण्यात आले.

माहितीनुसार, नाशिक महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत दर्ग्याला १ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. स्वतःहून अनिधिकृत दर्ग्याचे बांधकाम काढून टाका अन्यथा पालिकेकडून तोडकाम करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. मात्र, पालिकेने दिलेली मुदत संपल्यानंतरही कारवाई झाली नसल्यामुळे आज अनधिकृत दर्गा पाडण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात आले. पण, काल रात्रीच याबाबत अफवा पसरली आणि जमावाने काठेगल्ली गाठली. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे जमाव आणखी आक्रमक झाला.

हेही वाचा..

नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला कायद्याचा सामना करावा लागेल

भारताचा डी2सी जागतिक स्तरावर फंडिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

‘पश्चिम बंगालच्या हिंदूंच्या रक्षणासाठी वेळ पडल्यास “लष्कर” घुसवा!’

ममता बॅनर्जींना दंगलपीडितांची झाली आठवण, १० लाख भरपाई देणार

दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून १५ हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीवर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या काठेगल्ली परिसरातील वाहतूक मार्गात अनेक बदल केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
246,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा