जम्मू-काश्मीरमधील अखनूर शहरातील तांडा भागात गुरुवारी (३० मे) बस खोल दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली.या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून ४० हुन अधिक जण जखमी झाले आहेत.भोले बाबाचे दर्शन घेण्यासाठी भाविक शिवखोडीकडे जात असताना कालीधर मंदिराजवळ बस अचानक खोल खड्ड्यात पडल्याने ही दुर्घटना घडली.
हे सर्व भाविक उत्तर प्रदेशातील हाथरस येथील राहणारे आहेत.जम्मूमधून रियासी जिल्ह्यातील शिव खोरी मंदिराकडे जात असताना जम्मू-पूंछ महामार्गावरील काली धार मंदिराजवळ ही बस दरीत कोसळली.या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून ४० हुन अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.जखमींना अखनूर येथील स्थानिक रुग्णालयात आणि जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले आहे.यामध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा..
मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्ट्रिकची संधी…
‘मोदी जेव्हा तोंड उघडेल, तेव्हा तुमच्या सात पिढ्यांचा हिशेब करेल’
कारसेवक देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतले रामललांचे दर्शन!
“केजरीवालांची प्रकृती खराब आहे तर ते निवडणुकीचा प्रचार का करतायत?”
या बसमध्ये ६० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे.बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन बचाव मोहीम सुरु आहे.दरीत पडलेल्या बसला बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.बस अपघातात मृत झालेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना २ लाख रुपये दिले आणि जखमींना ५०,००० रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.