संरक्षण मंत्रालयाकडून २०२५ हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून घोषित

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले जाहीर

संरक्षण मंत्रालयाकडून २०२५ हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून घोषित

संरक्षण मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेत २०२५ हे वर्ष ‘सुधारणेचे वर्ष’ (year of reform) म्हणून घोषित केले आहे. या घोषणेसह, सशस्त्र दलाला तांत्रिकदृष्ट्या प्रगत, लढाऊ तयार दलात म्हणजेच कॉम्बॅट रेडी फोर्समध्ये रूपांतर करण्याचे संरक्षण मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नव वर्षाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांसह विविध योजना, प्रकल्प, सुधारणा आणि पुढील मार्गावरील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये संरक्षण क्षेत्रात चालू असलेल्या योजना आणि भविष्यातील सुधारणांना चालना देण्यासाठी, २०२५ हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून पाळण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. सशस्त्र दलाला तांत्रिकदृष्ट्या प्रगत लढाऊ तयार दलात रूपांतरित करण्याचे याचे उद्दिष्ट असून त्यामुळे सशस्त्र दल बहु-डोमेन एकात्मिक ऑपरेशन्ससाठी सक्षम असेल. एकत्रिकरण आणि एकात्मता उपक्रम, एकात्मिक थिएटर कमांड्सच्या स्थापनेची सुविधा याशिवाय, सुधारणांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे यावर देखील जोर देण्यात आला.

हे ही वाचा  : 

२६/११ चा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा!

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हत्याकांडाने हादरलं; चार बहिणींसह आईची हत्या

संतोष देशमुख प्रकरण, आरोपीच्या अटकेसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन!

“केजरीवालांनी खोटे बोलण्याची आणि फसवणुकीची वाईट सवय सोडून द्यावी”

सायबर आणि स्पेस सारख्या नवीन क्षेत्रांवर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, हायपरसोनिक्स आणि रोबोटिक्सशी संबंधित तंत्रे आणि भविष्यातील युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक प्रक्रिया देखील विकसित केल्या पाहिजेत, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. आंतर-सेवा सहकार्याद्वारे ऑपरेशनल आवश्यकता आणि संयुक्त ऑपरेशनल क्षमतांची सामायिक समज विकसित करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. सुधारणेचे हे वर्ष सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “हे देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये अभूतपूर्व प्रगतीचा पाया घालेल, अशा प्रकारे २१ व्या शतकातील आव्हानांमध्ये देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करण्याची तयारी करेल.”

Exit mobile version