इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२३ चा बिगुल आजपासून वाजणार आहे. कोचीमध्ये आज पुढील हंगामासाठी मिनी लिलाव होणार आहे. हा लिलाव दुपारी २.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. यावेळी मिनी लिलावासाठी ४०५ खेळाडू निवडले गेले आहेत. या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व ४०५ खेळाडूंपैकी २७३ खेळाडू भारतीय आहेत, तर १३२ खेळाडू परदेशी आहेत. लिलावात सहभागी झालेल्या सर्व दहा फ्रँचायझींकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी फक्त ८७ स्लॉट रिकामे आहेत. म्हणजेच जास्तीत जास्त खेळाडू खरेदी करता येतील. परदेशी खेळाडूंसाठी स्लॉटची कमाल संख्या तीस आहे. प्रत्येक फ्रँचायझीच्या संघात केवळ २५ खेळाडू असू शकतात, त्यापैकी जास्तीत जास्त आठ परदेशी खेळाडू असू शकतात.
यावेळी लिलावात खेळाडूंची कमाल आधारभूत किंमत दोन कोटी रुपये आहे. यामध्ये १९ विदेशी खेळाडू आहेत. तर अकरा खेळाडूंची मूळ किंमत दीड कोटी रुपये आहे. याशिवाय मयंक अग्रवाल आणि मनीष पांडे हे दोन भारतीय खेळाडू वीस खेळाडूंच्या यादीत आहेत ज्यांना एक कोटी रुपयांच्या किंमतीच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
या वेळी भारतीय स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, मयंक अग्रवाल यांच्याशिवाय विदेशी खेळाडू जो रुट, केन विल्यमसन, शकीब अल हसन, बेन स्टोक्स, सॅम करण, लिटन दास, जेसन होल्डर यांच्याकडे लिलावाच्या वेळी सर्वांच्या नजरा असतील. गेल्या वेळी विल्यमसनने सनरायझर्स हैदराबादचे तर मयंक अग्रवालने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते.
हे ही वाचा :
शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना
पश्चिम रेल्वे करणार ६ गाड्यांचा विस्तार
ती वडिलांसाठी काळजाचा तुकडा होती! तिने शरीराचा तुकडा वडिलांना देत फेडले ऋण
पंतप्रधान मोदींकडून कोरोनाबाबत सावधगिरीचे निर्देश
सनरायझर्स हैदराबादकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी सर्वाधिक तेरा स्लॉट रिक्त आहेत. तसेच, त्याच्याकडे सर्वाधिक ४२.२५ कोटी रुपये शिल्लक आहेत. अशा वेळी हैदराबाद संघाकडून मोठ्या बोलीची अपेक्षा आहे.