मुंबई- गोवा कॉर्डेलिया क्रूझवरील एका क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, यानंतर क्रूझवरील तब्बल २ हजार प्रवाशांना क्रूझवरच थांबवून ठेवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली असून या कोरोना चाचणीचे अहवाल समोर येईपर्यंत अधिकाऱ्यांनी या प्रवाशांना क्रूझवरच थांबण्यास सांगितले आहे. ही क्रूझ मुंबईहून निघून गोव्यातील मुरगाव क्रूझ टर्मिनलवर पोहचली होती.
आरोग्य अधिकाऱ्यांनी क्रूझवरील सर्व २ हजार प्रवाशांची कोरोना चाचणी घेतली असून आता हे प्रवासी त्यांच्या अहवालाची वाट पाहत क्रूझवर थांबले आहेत, असे वृत्त ‘लाईव्ह हिंदुस्तान’ने दिले आहे. या घटनेमुळे गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या क्रू मेंबरला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये हा संबंधित क्रूझवरील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. खबरदारीचा उपाय म्हणून क्रूझवरील अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूझवरच राहण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा:
भाजप नेते आर. एन. सिंह यांचे निधन
जेवण दिले नाही म्हणून हॉटेल मालकाला घातली गोळी
फुटबॉलपटू मेस्सीला कोरोनाने गाठले
देशभरातील मुलांच्या ‘दंड’बैठका आजपासून सुरू
या सर्व प्रवाशांनी लसीचे दोन डोस घेतलेले असून ज्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती त्याला एक दिवस ताप आला होता, अशी माहिती देण्यात आली आहे. रात्रीपासून या प्रवाशांची चाचणी सुरू असल्याचे वृत्त आहे.