महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एका गावात आयोजन करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात अन्न सेवन केल्यामुळे सुमारे २,००० लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.मंगळवारी (६ फेब्रुवारी) नांदेड जिल्ह्यातील कोष्टवाडी गावात धार्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याला जवळपासच्या सावरगाव, पोस्टवाडी, रिसनगाव आणि मस्की गावातील स्थानिक लोक जमले होते आणि सर्वांनी सायंकाळी ५ च्या सुमारास जेवण केले होते.या सर्व लोकांना बुधवारी पहाटे उलट्या आणि जुलाबच्या तक्रारी सुरु होऊ लागल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सुरुवातीला नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात १५० लोकांना दाखल करण्यात आले.मात्र, नंतर या संख्येत भर पडली आणि ८७० रुग्णांना शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इतर विविध आरोग्य सुविधांमध्ये दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.गरज भासल्यास नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातही अधिक खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.तपासणीसाठी रुग्णांचे नमुने
घेण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियातील खासदाराने भगवतगीतेच्या साक्षीने घेतली शपथ
कर्नाटक: खोदकामात सापडली राम लल्लासारखी प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग!
उत्तरप्रदेश: आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी भाजपसोबत युती करण्याच्या मार्गावर?
‘काँग्रेसने नेतृत्वासाठी नेहरू-गांधी यांच्याशिवाय विचार करावा’
तसेच बाधित गावांमध्ये सर्वेक्षणासाठी पाच पथके तैनात करण्यात आली होती.याशिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जलद प्रतिसाद पथकही तयार करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.तसेच रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.