भारतात लसीकरणाचा आकडा १८ महिन्यात २०० कोटीपार

भारतात लसीकरणाचा आकडा १८ महिन्यात २०० कोटीपार

FILE PHOTO: A woman holds a small bottle labelled with a "Coronavirus COVID-19 Vaccine" sticker and a medical syringe in this illustration taken October 30, 2020. REUTERS/Dado Ruvic/File Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. देशात कोरोना लसीकरणाने नवा विक्रम केला असून, लसीकरणाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात २०० कोटींहून अधिक कोविड लस देण्यात आल्या आहेत.

आज, १७ जुलै रोजी राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहिमेचा ५४८ वा दिवस आहे. या दिवशी या मोहिमेने दोनशे कोटींचा कोविड लसीचा आकडा पार केला आहे. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. मनसुख मांडवीया यांनी भारताचे अभिनंदन केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, ‘सर्वांच्या प्रयत्नांमुळे आज देशाने दोनशे कोटी लसींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे १७ जुलै २०२२ हा दिवस कायम स्मरणात राहील.’

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, ‘भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला! दोनशे कोटी लसीच्या डोसचा विशेष आकडा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन. भारताच्या लसीकरण मोहिमेला प्रमाण आणि गतीने अतुलनीय बनवण्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचा अभिमान आहे. यामुळे कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढ्याला बळ मिळाले आहे.’

हे ही वाचा:

इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनमध्ये बाजी

“संजय राऊतांनी शांततेचा पवित्रा घेऊन शिंदे- ठाकरेंना एकत्र आणावं”

मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम २४ तास सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच सरकारने देशभरात लसीबाबत लोकांना जागरूक करण्यास सुरुवात केली होती. लस बनवण्याबरोबरच लोकांमधील लसीबाबतचा संकोच दूर करण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या.

Exit mobile version