24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषअग्निपथमध्ये नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती

अग्निपथमध्ये नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती

Google News Follow

Related

देशातून अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अग्निपथ योजनेबाबत सध्या बरेच राजकारण सुरू आहे, मात्र या योजनेतील विक्रमी अर्जांवरून तरुणांमध्ये या योजनेबाबत किती उत्साह आहे हे दिसून येत आहे. भारतीय नौदलाला गेल्या सात दिवसांत अग्निपथ योजनेसाठी ३ लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. नौदलात भरती होण्यासाठी महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचं दिसून आलं आहे. नौदलासाठी महिलांनी २० हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

भारतीय नौदलाला गेल्या सात दिवसांत अग्निपथ योजनेसाठी ३ लाख ३ हजार ३२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये महिलांनी २० हजार ४४९ नौदलात अर्ज केले आहेत. तर २ लाख ८२ हजार ८७९ युवकांनी अर्ज केले आहेत.
२४ जुलैपर्यंत अर्ज घेतले जाणार आहेत. नौदलाने १२ वी उत्तीर्ण तरुणांसाठी १५ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. पहिल्या आठवड्यात २० हजार ४४९ महिलांसह ३ लाख ३ हजार ३२८ तरुणांनी भारतीय नौदलात अग्निवीर होण्यासाठी अर्ज केला आहे. अग्निपथ योजनेच्या शुभारंभादरम्यान, भारतीय नौदल प्रमुख आर हरी कुमार यांनी घोषणा केली होती की, भारतीय नौदल तरुणांना तसेच तरुणींना अग्निपथ योजनेत महत्त्वाच्या भूमिकेत सामील होण्याची संधी देईल.

हे ही वाचा:

“नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यावर त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली”

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी

दरम्यान, महिलांना अग्निवीर बनवले जाईल आणि वेगवेगळ्या युद्धनौकांमध्ये त्यांना तैनात केले जाणार आहे. भारतीय नौदलापूर्वी भारतीय वायुसेनेनेही अग्निपथ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया उघडली होती, ज्यामध्ये विक्रमी संख्येने तरुणांनी अर्ज केले होते. अग्निपथ योजनेसाठी भारतीय हवाई दलात एकूण साडे सात लाख अर्ज आले होते, जी आजपर्यंतच्या कोणत्याही भरती प्रक्रियेतील सर्वाधिक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा