28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषसहा दिवसांमध्येचं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात २० पदके!

सहा दिवसांमध्येचं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात २० पदके!

टोकियो पॅरालिम्पिकचा १९ पदकांचा विक्रम मोडीत

Google News Follow

Related

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची यशस्वी घौडदौड सुरू असून खेळाडूंकडून जबरदस्त कामगिरी सुरू आहे. भारताच्या खात्यात आता एकूण २० पदके जमा झाली असून ही कामगिरी भारतीय खेळाडूंनी अवघ्या सहा दिवसांमध्ये केली आहे. शिवाय अशी कामगिरी करत इतिहास देखील रचला आहे.

पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेचा थरार सध्या सुरू असून या स्पर्धेत भारताने २० पदकांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये तीन सुवर्ण, सात रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे. यासह भारताने पॅरालिम्पिकमधील आपला जुना विक्रम मोडला आहे. पॅरिसपूर्वी भारताने टोकियो- २०२० मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण १९ पदके जिंकली होती. पण, आता पॅरिसमध्ये पहिल्या सहा दिवसातच भारतीय खेळाडूंनी पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मोडीत काढला आहे.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत चार खेळांमध्ये पदके जिंकली आहेत. त्यापैकी सर्वाधिक १० पदके ऍथलेटिक्समधून आली आहेत. त्याचबरोबर बॅडमिंटनमध्ये पाच तर नेमबाजीत चार पदके कमावली आहेत. तिरंदाजीतून एक पदक मिळाले आहे.

भारत १९६८ पासून पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होत असून पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंना पदकांचे खाते उघडता आले नव्हते. यानंतर १९७२ सालच्या स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळाले. भारताने पुढच्या दोन पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला नाही पण १९८४ मध्ये भारतीय खेळाडू चार पदके जिंकण्यात यशस्वी झाले. त्यानंतर २००४ च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये भारताला दोन पदके जिंकण्यात यश आले. यानंतर, २००८ बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये भारताला कोणतेही पदक मिळाले नाही आणि २०१२ लंडन पॅरालिम्पिकमध्ये केवळ एका पदकावर समाधान मानावे लागले. २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने चार पदके जिंकली होती. पुढे टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकून नवा विक्रम रचला आणि आता पॅरिसमध्ये भारताने टोकियोमधील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मागे टाकत नवा विक्रम रचला आहे.

हे ही वाचा : 

छत्तीसगडमध्ये नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा

गांधी घराण्याचा ‘किम जोंग’ अवतार उघड करणारे ‘भोलानाथ’ गेले…

ऊर्जा निर्मिती करारामुळे ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती

लालबाग अपघात: जोडीदारासोबत खरेदी करायला गेलेल्या नुपुरची स्वप्ने राहिली अधुरी…

पदक विजेत्या खेळाडूंची नावे-

  1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला १० मीटर एअर रायफल (SH1)
  2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला १० मीटर एअर रायफल (SH1)
  3. प्रीती पाल (ऍथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची १०० मीटर शर्यत (T35)
  4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष १० मीटर एअर पिस्तूल (SH1)
  5. रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला १० मीटर एअर पिस्तूल (SH1)
  6. प्रीती पाल (ऍथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची २०० मीटर शर्यत (T35)
  7. निषाद कुमार (ऍथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
  8. योगेश कथुनिया (ऍथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
  9. नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)
  10. मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU5)
  11. तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU5)
  12. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी (SL4)
  13. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन
  14. सुमित अँटील (ऍथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64)
  15. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH6)
  16. दीप्ती जीवनजी (ऍथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला ४०० मीटर (T20)
  17. मरियप्पन थांगावेलू (ऍथलेटिक्स पुरुष उंच उडी) – कांस्य पदक, (T63)
  18. शरद कुमार (ऍथलेटिक्स पुरुष उंच उडी) – रौप्य पदक, (T63)
  19. अजित सिंग (ऍथलेटिक्स पुरुष भालाफेक) – रौप्य पदक, (F46)
  20. सुंदर सिंग गुर्जर (ऍथलेटिक्स पुरुष भालाफेक) – कांस्य पदक, (F46)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा