अमरावतीजवळ मालगाडीचे २० डबे घसरले; ‘या’ रेल्वेगाड्या रद्द

कोळसा घेऊन जाणारी रेल्वे मालगाडी रुळांवरून घसरली.

अमरावतीजवळ मालगाडीचे २० डबे घसरले; ‘या’ रेल्वेगाड्या रद्द

महाराष्ट्र्रातील अमरावती जिल्ह्यातील टिमटाला ते नरखेडा भागातील रेल्वे मार्गातील रुळांवरून काल रात्री ११ च्या सुमारास हावडाच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे १५ ते २० डब्बे घसरले असून, नागपूर रेल्वे मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील रुळावरून घसरलेले माल डब्बे हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तर अनेक प्रवासी रेल्वे गाड्यांसह मालवाहतूक करणाऱ्या गाड्या नागपूर-नरखेड मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तर २४ ऑक्टोबरला काही सुटणाऱ्या प्रवासीगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे रात्रीच्या सुमारास रेल्वे रुळांवरून १५ ते २० डब्बे घसरल्यानंतर मुंबईहून नागपूर, नागपूरहून- कोलकाताला जाणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक खोळंबले आहे. तसेच काही वेळानंतर या मार्गावरील गाडयांना नरखेड ते अमरावती या मार्गावरून वळवण्यात आल्या. मात्र ऐन दिवाळीच्या दिवशी झालेल्या या घटनेने दिवाळीनिमित्त मूळगावी जाणाऱ्या किंवा सहलीसाठी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे दिसून येते. तसेच जवळपास सहा रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

“जवानांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करणे हे माझं भाग्य”

… आणि भारत- पाकिस्तान सामन्याच्या शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी विमान उड्डाण लांबवलं?

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

संबंधित घटना ही नागपूर डिव्हिजन मध्ये येत असून नागपूर डिव्हिजनमधील रेल्वे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ठप्प झालेली रेल्वेसेवा तात्काळ सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असून, आज सुटणाऱ्या सहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून १११२२ वर्धा-भुसावळ, १२१४० नागपूर-सीएसएमटी, १२११९ अमरावती-अंजणी, ११०४० गोंदिया-कोल्हापूर, ०१३७२ वर्धा-अमरावती, १७६४२ नरखेर-काचेगुडा या सर्व गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती संबंधित रेल्वे विभागाने दिली आहे.

Exit mobile version