उद्यापासून २ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

उद्यापासून २ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

१९ हजार कोटींची तरतूद

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ मे रोजी म्हणजेच शुक्रवारी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील. यानंतर ते पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करतील.

या कार्यक्रममध्ये तुम्ही pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यामध्ये २ हजार रुपयांची रक्कम मिळेल. नरेंद्र मोदी १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १९ हजार कोटी रुपये वर्गत करतीलय  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत ७ हप्त्यांमध्ये १४ हजार मिळाले आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आली होती. पहिल्यांदा ३ कोटी १६ लाख ०५ हजार ५३९ शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला. या योजनेंतर्गत आतापर्यंत १० कोटीहून अधिक शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता १० कोटी ७० हजार ९७८ शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने एकूण १० कोटी ४८ लाख ९५ हजार ५४५ शेतकर्‍यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठविले होते.

हे ही वाचा:

मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी होते तर लॉकडाऊन का वाढवला?

लसीकरणासाठी पैसा नाही म्हणणारे सोशल मिडियासाठी सहा कोटी खर्च करतायत

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत ‘कडक निर्बंध’

भारताने इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी-काँग्रेस

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम २५ डिसेंबर २०२० पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये जमा केले जातात. आतापर्यंत ९ कोटी ४१ लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा १ डिसेंबर ३१ ते मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.

Exit mobile version