30 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषएकदम 'बेस्ट'; ताफ्यात दाखल होणार २४०० इलेक्ट्रिक बसेस

एकदम ‘बेस्ट’; ताफ्यात दाखल होणार २४०० इलेक्ट्रिक बसेस

खाजगी कंत्राटदारांच्या दोन निविदा मान्य

Google News Follow

Related

मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळणार असून बेस्टच्या ताफ्यात नव्याने बसेसचा समावेश केला जाणार आहे. शहरातील प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी म्हणून २ हजार ४०० सिंगल- डेकर इलेक्ट्रिक एसी बस खरेदी करत असल्याची महत्त्वाची घोषणा सोमवार, २१ ऑगस्ट रोजी बेस्टने केली आहे. सोमवारी, बेस्ट उपक्रमाने नवीन बसेससाठी काढलेल्या निविदांसाठी खाजगी कंत्राटदारांच्या दोन निविदा मान्य केल्या असून लवकरच कार्यादेश जारी केले जातील, अशी माहिती समोर आली आहे.

बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या २ हजार ४०० सिंगल-डेकर बसेस या वर्षभरात टप्प्याटप्प्याने समाविष्ट केल्या जाणार आहेत. बेस्टने सध्याच्या बसेसची संख्या ३ हजर ५२ वरून ८ हजार करण्याची योजना आखली आहे. तसेच सध्या प्रति ४ हजार १९३ लोकसंख्येमागे एक बस असे गणित असून ते २०२४ च्या अखेरीस 1 हजार ५७६ लोकसंख्येमागे एक बस असे गुणोत्तर करण्याची योजना असणार आहे. नवीन ई-बस या १२ मीटर लांब असतील आणि त्यांची क्षमता आताच्या बसेसपेक्षा अधिक असेल. तसेच निविदा कलमात नमूद केले आहे की, कंत्राटदार भविष्यात आवश्यक असल्यास २५ टक्के अधिक बस म्हणजेच ६०० बसेस देतील.

बेस्टच्या या निर्णयामुळे यामुळे बसची सेवा आणखी सुधारेल तसेच व्यस्त मार्गांवर अधिक वाहने तैनात करता येऊ शकतील आणि बस स्टॉपवरील रांगा कमी होतील, असे मत परिवहन तज्ञांनी व्यक्त केले आहे. बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मेट्रो स्थानक १, २ अ आणि ७ बाहेरील फीडर मार्गांवर आणि संपूर्ण शहरातून येणाऱ्या सर्व कॉरिडॉरवर बसेस ठेवण्याची योजना असणार आहे.”

हे ही वाचा:

मुख्यमंत्री शिंदे रात्री अचानक केईएम रुग्णालयात अवतरले

अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयानावरून उडवली खिल्ली

५०० घरांची सोडत; गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळणार

ऋतुराज बरसला, संजू, रिंकूही ठरले दमदार

बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी सांगितले की, “आम्ही नवीन बस खरेदी करत आहोत आणि त्याच वेळी, इलेक्ट्रिक एसी डबल डेकर आणि १२ मीटर लांब सिंगल डेकर बसेसच्या प्रलंबित ऑर्डरसाठी जलद वितरण करत आहोत. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त चहल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, “२०२७ पर्यंत बसचा ताफा १०,००० पर्यंत वाढवण्यासाठी परिवहन उपक्रमाला पाठिंबा देण्यात येईल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा