29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषगणेशोत्सवाची तयारी सुरू; एसटीकडून २ हजार २०० जादा गाड्या सोडणार

गणेशोत्सवाची तयारी सुरू; एसटीकडून २ हजार २०० जादा गाड्या सोडणार

रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून गाड्यांचे नियोजन

Google News Follow

Related

गणेशोत्सव जसा जवळ येत आहे तसं कोकणात जाणारा चाकरमानी वाहतुकीचे पर्याय धुंडाळू लागतो. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. या कालावधीत लाखो चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. या भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबईहून एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

 

रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून बोरीवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडूप, भाईंदर, पुणे मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. एकूण २ हजार २०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून १ हजार ५५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. आतापर्यंत २७९ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे, अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली आहे.

 

प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकींगच्या बसेसही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक बसस्थानक तसेच खासगी आरक्षण केंद्राकडे आरक्षण सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल ऍपच्या मदतीने प्रवाशांना ऑनलाईन आरक्षणही करता येणार आहे. १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार असून १५ सप्टेंबरपासून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तर, २३ सप्टेंबरपासून परतीसाठी एसटीच्या बसेस सोडण्यात येतील.

हे ही वाचा:

मुंबई- जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणातील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर

इथे औरंगजेब नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजच हिरो !

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती ऑफर

विहिरीचं काम सुरू असताना अपघात; चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

दापोली आगारातून २००, खेड १५०, चिपळूण २३०, गुहागर २६०, देवरूख १८०, रत्नागिरी १५०, लांजा १३०, राजापूर १७०, मंडणगड आगारातून ८० मिळून, अशा एकूण १ हजार ५५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा