जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला, २ दहशतवादी ठार!

सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरु

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला, २ दहशतवादी ठार!

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.सुरक्षा दलांना याची माहिती मिळताच त्यांनी घुसखोरांना घेरले. सुरक्षा दलांनी घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेच्या पुढील भागात चार ते पाच दहशतवादी घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, आणखी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती सुरक्षा पथकाला मिळाली होती.गुप्त माहितीच्या आधारे भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अमरोही, तंगधरच्या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली.या शोधमोहीम दरम्यान पथकाला दोन पिस्तूल, दारूगोळा आणि इतर युद्धसदृश साठा मिळाला आहे.पथकाकडून परिसरात शोधमोहीम सुरु आहे.

हे ही वाचा:

लालूप्रसाद, अब्दुल्ला मोदींच्या पत्नी-मुलांवरून टीका करण्यापर्यंत घसरले!

बरेलीची फरजाना बनली पल्लवी; मुरादाबादची नर्गिस बनली मानसी!

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा फुटबॉलला अलविदा!

चाललंय काय? भारत चंद्रावर पोहोचला, कराचीतली मुले मात्र गटारात!

दरम्यान, बारामुल्ला लोकसभा जागेसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलीस, सीआरपीएफ, लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणा सतर्कता बाळगत आहेत.जम्मूमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत, १६ कॉर्प्सचे GOC, लेफ्टनंट जनरल नवीन सचदेवा यांनी सांगितले की, राजोरी, पूंछ आणि बसंतगडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सभ्भागी झालेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला जाईल.सुरक्षा दलाकडून तपास सुरु आहे.

Exit mobile version