उत्तर काश्मीरच्या बारामुल्लामधील सोपोर येथे बुधवारी (१९ जून) दुपारच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. दरम्यान, या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला उपाचारसाठी त्वरित रुग्णालयात नेण्यात आले असून सुरक्षा दलाकडून अजूनही शोधमोहीम सुरु आहे.
बुधवारी सकाळी सोपोरच्या हदीपोरा गावात दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलांनी तातडीने परिसराला वेढा घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. सोपोर पोलिस, लष्कराच्या-३२ आरआर आणि सीआरपीएफच्या जवानांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली. त्याच दरम्यान कडेकोट बंदोबस्त पाहताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. याला सुरक्षा दलांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. अशा प्रकारे चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
हे ही वाचा:
संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत विवान कारुळकर लिखित पुस्तकाचे वितरण
‘आगीत पुस्तके जळू शकतात, परंतु ज्ञान नाही’, पंतप्रधान मोदी!
राज्यातील प्रत्येक तुरुंगातून तयार होणार बुद्धिबळपटू!
केजारीवालांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलै पर्यंत वाढ
दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसून तपास सुरु आहे. सोपोर पोलिस, लष्कराच्या- ३२आरआर आणि सीआरपीएफ जवानांची परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु आहे.