जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत २ जवान हुतात्मा तर ६ दहशतवादी ठार!

सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहीम सुरु

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत २ जवान हुतात्मा तर ६ दहशतवादी ठार!

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी (६ जुलै) दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत आतापर्यंत सहा दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र, या दोन्ही कारवायांमध्ये दोन जवानांना वीरमरण आले आहे. दरम्यान, सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहीम सुरु आहे.

कुलगाम जिल्ह्यात शनिवारी दोन ठिकाणी चकमक सुरू झाली, जी रविवारीही सुरू राहिली. आयजी बीके बिर्डी यांनी सांगितले की, फ्रिसल, चिन्निघम आणि मुद्रघम भागात ही चकमक झाली. या चकमकीत फ्रिसल चिन्निगममध्ये चार तर दोन मुद्रघम येथे दहशतवादी मारले गेले. या कारवाईत मुद्रघम येथे पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप नैन आणि फ्रिसलमध्ये राष्ट्रीय रायफल्सचा हवालदार राजकुमार जखमी झाला. त्यानंतर दोन्ही जवानांना रुग्णालयात दाखल कारण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

राज्यात नव्याने १० हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार

२३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

एक गठ्ठा मुस्लीम मतांचा भारतापाठोपाठ ब्रिटनमध्येही पराभव

१४७ गुंतवणूकदारांना गंडा घालून एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी विशिष्ट माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने कुलगामच्या मुद्रघम भागात घेराबंदी आणि शोध मोहीम राबवली. सुरक्षा दल संशयित भागाकडे सरकताच लपलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे चकमक सुरू झाली. दरम्यान, काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही के बिरधी यांनी चकमकीच्या ठिकाणांना भेट दिली आणि दहशतवादविरोधी कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version