जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमक; दोन जवान हुतात्मा !

चकमकीत एका जखमी नागरिकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमक; दोन जवान हुतात्मा !

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी (१० ऑगस्ट) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले तर एका नागरिकाचा मुत्यू झाला. कोकरनाग जंगल परिसरात ही चकमक झाली, यामध्ये अन्य तीन जवान जखमी झाले आहेत.

या चकमकीत हवालदार दिपक कुमार यादव आणि लान्स नाईक प्रवीण शर्मा यांना कर्तव्य बजावताना वीर मरण आले. तर शनिवारी झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका नागरिकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी रविवारी या भागात पुन्हा दहशतवादविरोधी कारवाया सुरू केल्या. १९ राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल फोर्सच्या अतिरिक्त तुकड्यांनी शोधमोहिमेला जोरदार सुरुवात केल्या आहेत.

हेही वाचा..

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ

परमबीर यांचा पर्दाफाश करण्याची देशमुखांना संधी…

म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत १४ लाख खातेदारांना ५२१६ कोटींचे वाटप

अंबाझरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवनासाठी १० कोटी

सैनिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “कोकरनाग, अनंतनाग (J&K) येथे दहशतवादविरोधी कारवाईत आमच्या धाडसी आणि निर्भय भारतीय सैन्याच्या जवानांना गमावल्याबद्दल खूप दुःख झाले आहे. या दु:खाच्या वेळी कुटुंबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

अनंतनाग जिल्ह्यातील आहलान गागरमांडू या दुर्गम जंगलामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यांच्या विरोधात घेराबंदी आणि शोधमोहीम राबवण्यात येत होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी गोळीबार केला. या चकमकीत सहा जवान जखमी झाले आणि दोन नागरिक जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले असता, तेथे दोन जवान हुतात्मा झाले. दोन जखमी नागरिकांपैकी एका नागरिकांचाही रुग्णालयात मृत्यू झाला.

 

Exit mobile version