देशात उष्णतेच्या झळा वाढत असताना दुसरीकडे आसाममध्ये मात्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे पूर आला असून भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली आहे. आसामच्या २० जिल्ह्यांमधील जवळपास २ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.
दिमा हासाओ जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात भूस्खलनामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यानं त्याचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर कछार जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा:
…. असे आहे पंतप्रधान मोदींचे भगवान बुद्धांशी नाते
‘खोटी नियत, कद्रु दानत हीच या खंडणीखोर सरकारची ओळख’
अमृता फडणवीस म्हणाल्या, वजनदार ने हलके को…
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिलेल्या माहितीनुसार, १ लाख ९७ हजार २४८ लोकांना फटका बसला आहे. पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आलेल्या ३२ हजार ९५९ लोकांना सात जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या सुमारे ५५ मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन पथकं आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.