26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषनेमबाजीत सुवर्णपदक मिळवणा-या रुद्राक्ष पाटीलला दोन कोटी

नेमबाजीत सुवर्णपदक मिळवणा-या रुद्राक्ष पाटीलला दोन कोटी

ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले जाहीर

Google News Follow

Related

भारताचा नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या नेमबाजी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यानिमित्ताने रुद्रांक्ष पाटील याला रोख दोन कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले आहे.

ठाण्यात राहणाऱ्या १८ वर्षीय रुद्रांक्ष पाटीलने इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा १७-१३ असा पराभव केला. एका क्षणी तो अंतिम सामन्यात पिछाडीवर होता, पण नंतर त्याने शानदार पुनरागमन करत सामना जिंकला. यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून ऑलिम्पिकसाठी चार कोटा उपलब्ध आहेत. भारताने नुकताच क्रोएशियातील शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या सापळ्यातील पहिला कोटा भौनीश मेंदिरट्टाद्वारे मिळवला.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे ऐकण्याची गरज नाही, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पाकला सुनावले

पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस

पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

रुद्रांक्ष पाटीलने शुक्रवारी ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. त्याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. दरम्यान, रुद्राक्ष प्रथमच जागतिक स्पर्धेत सहभागी झाले आहे. सामन्यात एका वेळी तो ४-१० ने पिछाडीवर होता. फायनलमध्ये बहुतेक वेळा इटालियन नेमबाजाने आघाडी घेतली होती, पण शेवटी रुद्राक्षने जोरदार पुनरागमन केले आणि विजेतेपद मिळवले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा