जर्मन लक्झरी ऑटोमेकर मर्सिडीज- बेंझने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक EQS- 53 भारतात सादर केली आहे. याची किंमत २.४० कोटी (एक्स-शोरूम) आहे. यासह ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि पोर्श टायकन नंतर ही देशातील सर्वात महाग इलेक्ट्रिक वाहन बनले आहे. २ वर्षांमध्ये ३० हजार किमीच्या सर्व्हिस वॉरंटीसह उपलब्ध आहे तसेच अतिरिक्त्त पैसे भरल्यास १० वर्षात २ लाख ५० हजार किमी पर्यंत बॅटरी वॉरंटीसह उपलब्ध होऊ शकते. मर्सिडीज- बेंझने भारतात पुढील महिन्यात कार लॉंच केली जाईल, असे सांगितले आहे.
मर्सिडिज तर्फे २०२५ पर्यंत विकल्या जाणाऱ्या निम्या मोटारी या विजेवर चालणाऱ्या असतील, जिथे आवश्यक असतील तेथील बाजारपेठात २०३० पर्यंत इलेक्ट्रिक कार विकल्या जातील. तसेच या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये मर्सिडिजने संपूर्ण जागत ४५ हजार इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. तसेच येत्या ५ वर्षात भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक चतुर्थांश भाग हा विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा असणार आहे असे, मर्सिडीज- बेंझ इंडियाचे एमडी व सीईओ मार्टिन शवेक यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुंबई मनपा आयुक्त चहल यांची होणार बदली
लाज वाटते का, यावरून मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरेंना झापले
गेटवे ऑफ इंडियावर काही दिवस जाऊ नका
झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांच्यावर मुख्यमंत्रीपद गमावण्याची वेळ?
भारतात मर्सिडीज- बेंझच्या या वर्षभरात तीन इलेक्ट्रिक कार आणल्या जातील. तसेच मर्सिडिजच्या सर्व चार्जिंग स्टेशनवर या इलेक्ट्रिक वाहनांना विनामूल्य चार्जिंग सेवा पुरवली जाणार आहे. या कारमध्ये प्लॅस्टिक बाटल्यांच्या आधारे सीट कव्हर बनवल्या जाणार आहे. एकूण ९ एअरबॅग्स असणार आहेत. इलेक्ट्रिक वाहन ३० मिनिटात ८० टक्के चार्जिंग होईल. एकदा चार्जिंग केल्यावर ही गाडी ५२९ ते ५८६ किमी पर्यंत प्रवास करू शकते. ३५० सेन्सॉर लावण्यात आले असून, हवा शुद्ध करण्यासाठी एचईपीए फिल्टर लावण्यात येणार आहेत.