जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत चार जवान हुतात्मा!

दोन अधिकाऱ्यांचा समावेश

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत चार जवान हुतात्मा!

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान हुतात्मा झाले. यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. राजौरीतील धरमसालच्या बाजीमल भागात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त नाकेबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन अधिकाऱ्यांसह चार जवान हुतात्मा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी सुरक्षा दलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय रायफल्सचे १६ कॉर्प्स कमांडर आणि रोमियो फोर्स कमांडर या कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या भागात दहशतवाद्यांच्या एका गटाच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर या भागात विशेष दलांसह सैन्य तैनात करण्यात आले आहे.बुधवारी ही घटना घडली.

राजौरी-पूंचचे डीआयजी राहे हसिब मुघल यांनी सांगितलं की, या भागात काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती आमच्याकडं आली. त्यानुसार या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी स्थानिक पोलीस, लष्कराचे जवान आणि सीआरपीएफचे जवान यांनी संयुक्त शोध मोहिम सुरु केली होती.याचवेळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात दोन अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्यानं ते गंभीररित्या जखमी झाले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अजूनही या भागात गोळीबार सुरु असून ठिकठिकाणी जवानांची कुमक वाढवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

येमेनमध्ये भारतीय मुलीला मृत्युदंडाची शिक्षा

पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान काकर यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून समन्स

मराठा राहिला बाजूलाच, मुस्लिम आरक्षणासाठी दोन्ही काँग्रेसची बँटींग…

साडेतीन कोटी खर्च केल्याचा आरोप हास्यास्पद!

दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी रविवारपासून या भागात नाकाबंदी आणि शोध मोहीम सुरू आहे. शोध मोहिमेदरम्यान गावकऱ्यांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व मुलांना शाळेत जाण्यास रोखले होते.

राजौरी आणि पुंछ या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये गेल्या अठरा महिन्यांत दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, १७ नोव्हेंबरला राजौरीतील गुल्लर बेहरोटे भागात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता.त्याचप्रमाणे, ७ ऑगस्ट रोजी लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, परिणामी पूंछच्या देगवार भागात एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. याव्यतिरिक्त, ५ मे रोजी राजौरी जिल्ह्यातील केसरी हिल्समध्ये दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान लष्कराच्या पाच जवानांना आपला जीव गमवावा लागला होता.

Exit mobile version