एका मागून एक तीन भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तरकाशी हादरले

जीवित वा वित्तहानी नाही. भूकंपाच्यावेळी खिडक्या आणि दरवाज्यांचा मोठा आवाज झाला. स्वयंपाकघरात ठेवलेली भांडीही पडली.

एका मागून एक तीन भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तरकाशी हादरले

उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी रात्री उशिरा एकापाठोपाठ एक भूकंपाचे तीन धक्के बसले आहेत. एकामागून एक धक्के बसल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले.भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपाचा पहिला धक्का मध्यरात्री १२.४० वाजता, दुसरा १२.४५ वाजता आणि तिसरा धक्का १ वाजून १ मिनिटांनी जाणवला. हा भूकंप २.५ क्षमतेचा होता. भूकंपाच्यावेळी खिडक्या आणि दरवाज्यांचा मोठा आवाज झाला. स्वयंपाकघरात ठेवलेली भांडीही पडली. एकापाठोपाठ एक असे तीन भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. भीतीमुळे लोक बराच वेळ घराबाहेरच होते.

उत्तराखंडमधील अनेक भागात जमीनीला तडे जाण्याच्या घटना आधीच घडल्याने लोक आधीच घाबरले आहेत. त्यातच भूकंपाच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे स्थानकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यात २.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये उत्तरकाशीमध्ये ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

हे ही वाचा :

ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा

स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर

हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!

जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू

जोशीमठ येथे दरड कोसळल्याने सर्व घरे आणि हॉटेलमध्ये भेगा पडल्या आहेत. प्रशासनाने अनेक भाग असुरक्षित विभाग म्हणून जाहीर केले आहेत. ज्या घरांचा आणि इमारतींचा सर्वाधिक फटका बसला आहे, ती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जोशीमठमध्ये घरांना भेगा पडल्यापासून जमिनीतूनही पाणी बाहेर येत आहे. प्रशासनाने तेथील घरे रिकामी करून तेथे राहणाऱ्या लोकांना तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतरित केले आहे.

Exit mobile version