१८ व्या लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा दिवस गौरवाचा, वैभवाचा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या नव्या संसदेत हा शपथसोहळा होत आहे. यापूर्वी हा सोहळा पूर्वीच्या संसदेत पार पडत होता. सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. नवा उमंग, उत्साह, गती, उंची प्राप्त करण्यासाठी हा एक अतिशय महत्वाचा प्रसंग आहे. श्रेष्ठ भारत निर्माण आणि विकसित भारत २०४७ चे लक्ष्य समोर ठेवून, आज १८ व्या लोकसभेचा प्रारंभ होत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, जगातील सर्वात मोठी निवडणूक नुकतीच पार पडली. ६५ करोड मतदारांनी निवडणुकीत भाग घेतला. देशाच्या जनतेने तिसऱ्यांदा पुन्हा काम करण्याची संधी दिली असून स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा अशी एखादा पक्षाला संधी मिळाली आहे. ही संधी ६० वर्षांच्या कालावधीनंतर आली आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज असते. तर देश चालवण्यासाठी सहमतीची गरज असते. त्यामुळे सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतली जातील आणि देशाच्या हिताचे काम व्हावे यासाठी आमचे सरकार काम करेल. तिसऱ्या कार्यकाळात आमचे सरकार तिप्पट मेहनत करेल आणि देशाच्या तीनपट विकास करेल. भारताला लवकरच गरिबीतून मुक्त करणार, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी यावेळी दिले. तसेच वैदिक अंकशास्त्रात १८ ची मूळ संख्या ९ (१+८) असल्याने पंतप्रधान मोदींनी त्याचे महत्व पटवून सांगितले.
हे ही वाचा:
भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!
दागेस्तानमध्ये दहशतवाद्यांचा सिनेगॉग, चर्चवर हल्ला!
नेमबाजीतला गोल्डन बॉय अवनीश पाटील
भाजपा आमदार मंगेश चव्हाणना धमकी देणाऱ्या जोर्वेकरांविरोधात आंदोलन!
ते म्हणाले की, ज्यांना भारताच्या सांस्कृतिक वारशाची माहिती आहे त्यांना १८ क्रमांकाचे सात्विक मूल्य माहिती आहे. गीतेत १८ अध्याय आहेत. कर्म, कर्तव्य, करुणाचा संदेश यामधून आम्हाला मिळतो. प्राचीन आणि उपप्राचीनची संख्या देखील १८ आहे. १८ चा मूळ अंक ९ आहे आणि ९ अंक हा पूर्णतेची गॅरंटी देतो. पूर्णतेचा प्रतीक अंक हा ९ अंक आहे. आपल्या देशातही लोकांना वयाच्या १८ व्या वर्षीच मतदानाचा अधिकार मिळतो. १८ व्या लोकसभेची स्थापना हे देखील एक चांगले लक्षण असल्याचे पीएम मोदी म्हणाले.
विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की, जनतेला विरोधकांकडून चांगल्या पावलांची अपेक्षा आहे, मात्र आतापर्यंत निराशाच मिळाली आहे. ते आपली भूमिका चोख बजावतील आणि लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील, अशी आशा आहे. ते म्हणाले की, भारताला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे आणि लोकांना केवळ घोषणा नको आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या अशी अपेक्षा त्यांच्या आहेत. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, संसदेत चर्चा आणि मेहनत हवी व्यत्यय नको.