इस्रायलने सोमवारी (२३ सप्टेंबर) दक्षिण लेबनॉनमध्ये आपले हल्ले तीव्र केल्यामुळे लहान मुले, महिला आणि डॉक्टरांसह किमान १८२ लोक मारले गेले आहेत तर ७०० हून अधिक जखमी झाले आहेत, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे की, सुमारे १५० हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये हिजबुल्लाच्या स्थानांना लक्ष्य करण्यात आले आहे.
हवाई हल्ल्याची माहिती देताना लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील गाव आणि शहरांवर हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये १८२ लोक मारले गेले आहेत, यामध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे. संरक्षण दलाने लोकांना ताबडतोब त्यांची घरे आणि इतर इमारती सोडण्याचा इशारा दिला आहे. हिजबुल्लावर दबाव आणण्यासाठी हे हल्ले केल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे.
हे ही वाचा :
तीन बांगलादेशी नागरिकांसह दोन भारतीय दलालांना अटक
गाझियाबादमध्ये लघवी-थुंकीच्या कारनाम्यांविरोधात हिंदू संघटनांची महापंचायत, बहिष्काराची घोषणा!
रोहित पवार, जरांगेंना शुगर फ्री ज्युस घेऊन जा!
दरम्यान, इस्रायलचे गेल्या एक वर्षापासून हमास आणि हिजबुल्लासोबत युद्ध सुरु आहे. पण आजच्या हवाई हल्ल्याने एक दिवसात हिजबुल्लाचे इतके नुकसान होणे ही पहिलीच वेळ आहे.