अठरा नव्या उपग्रहांसह भगवत गीता आणि नरेंद्र मोदींचा फोटोही अंतराळात

अठरा नव्या उपग्रहांसह भगवत गीता आणि नरेंद्र मोदींचा फोटोही अंतराळात

नव्या वर्षात भारतानं नवं अवकाश मिशन हातात घेतलं आहे. आज सकाळी इस्रो या अंतराळ संस्थेच्या पीएसएलवी-सी ५१ने एकूण अठरा सॅटेलाइट लॉन्च केल्या आहेत. या अभियाना अंतर्गत ब्राझिलच्या अमेझोनिया-१ सॅटेलाइटलाही लॉन्च केलं आहे. विशेष म्हणजे इस्रोने या सॅटेलाइटसोबत भगवद गीतेची एक इलेक्ट्रॉनिक प्रतही अंतराळात पाठवली आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार पीएसएलव्ही-सी ५१ आणि पीएसएलव्हीचं हे ५३वं मिशन आहे. चेन्नईपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटाहून हे सॅटेलाइट अंतराळात लॉन्च करण्यात आले आहेत. आज सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी हे सॅटेलाइट लॉन्च करण्यात आले आहेत. या उड्डाणाची काल शनिवारी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांपासूनच काऊंटडाऊन सुरू झालं होतं.

हे ही वाचा:

अवकाशात प्रस्थापित होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि भगवद्गीता असलेला उपग्रह

भारताने आज अंतराळात पाठवलेल्या अमेझोनिया-१द्वारे पृथ्वीवर वॉच ठेवण्यात येणार आहे. अमेझोनिया उपग्रह ब्राझिलने तयार केला असून लॉन्चिंग नंतर चीन आणि ब्राझिल त्याचं संयुक्तपणे संचालन करणार आहेत. या मिशनचा कालावधी तीन वर्षाचा आहे.

स्पेस किड्ज इंडियाने सतीश धवन सॅटेलाइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे सॅटेलाइटसोबत मोदींचा फोटोही अंतराळात पृथ्वीभोवती फिरताना दिसणार आहे.

Exit mobile version