दोन वर्षाच्या महामारीनंतर देशात सण उत्सव उत्साहात साजरे होत आहेत. या वर्षी गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे. संपूर्ण देशात या उत्साहाची लाट पसरलेली दिसत आहे. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही गणेश उत्सवाचे जोरदार नियोजन करत आहेत. उत्तर प्रदेशातील चंदौसी येथे गणेश चतुर्थीसाठी १८ फूट उंच सोन्याने मढवलेली मूर्ती साकारली आहे.
#WATCH | 'Swarna Ganesh' adorned with gold is being made in UP's Chandausi for Ganesh Chaturthi
"It will be an 18 feet tall idol. It is being prepared with gold decorative items on the lines of Tirupati Balaji," says Ajay Arya, a person associated with the project pic.twitter.com/B5RH2eXTnh
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 25, 2022
यूपीतील चंदूसी इथे १८ फूट उंच स्वर्ण गणेश साकारण्यात येत आहे. या गणपतीचे दागिने सोन्याचे करण्यात येत आहेत. तिरूपती बालाजीच्या धरतीवर या गणपतीला साकारण्यात येत असल्याची माहिती या प्रोजेक्टशी संबंधीत अजय आर्य यांनी दिली आहे. सोशल मीडियावर या गणेश मूर्तीला खूप मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. या मूर्तीच्या ४० ते ५० टक्के सोने वापरण्यात येणार असून बाकी इतर धातूंचा मृत्यू बनवण्यासाठी वापर करण्यात आला आहे. गणेश मूर्तीसाठी बनवलेले दागिने एकदम रेखीव आहेत. मुंबई-पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह जग जाहीर असला तर संपूर्ण देशात या उत्सवाला खूप उत्सहात साजरा केला जातो.
हे ही वाचा:
‘आता महामार्गावर टोलनाक्यांऐवजी कॅमेरे बसवले जाणार’
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांना ईडीकडून अटक
एरंगल गावातील बेकायदा स्टुडिओ प्रकरणाची होणार सखोल चौकशी
या प्रकल्पातील सहभागी अजय आर्य म्हणाले, मूर्ती १८ फूट उंच आहे. त्यासाठी तिरुपती बालाजीच्या शैलीत सोन्याचे दागिने तयार केले जात आहेत. दक्षिण भारतातही गणेश उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील सर्वात उंच गणेश मूर्ती बनवण्यात आली आहे. त्या मूर्तीची उंची ८९ फुट आहे. तीस कारागिर ही मूर्ती बनवत असून, १४ जण मूर्तीच्या सजावटीचे काम करत आहेत. विशेष म्हणजे ही मूर्ती कोरडे गवत आणि लाकडाच्या तुकड्यांपासून बनवण्यात आले आहे.