22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषहिमाचलमध्ये तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू, उत्तराखंडमध्ये चार जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

हिमाचलमध्ये तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू, उत्तराखंडमध्ये चार जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Google News Follow

Related

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. हिमाचलमध्ये आतापर्यंत तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच उत्तराखंडमध्ये चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन्ही राज्यातील अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तराखंडमध्ये डेहराडूनजवळील मालदेवता सरखेत, टिहरी आणि यमकेश्वर भागात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशातही मंडी आणि चंबा जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. यामध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला आहे, तर १५ ते २० जण वाहून गेले आहेत. चंबा येथे दरड कोसळल्याने आई आणि मुलासह तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली गाडले अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

महसूलचे प्रधान सचिव ओंकार शर्मा यांनी सांगितले की, राज्यात पावसाळ्यात आतापर्यंत २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी २२ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील ३३६ लहान-मोठे रस्ते बंद करण्यात आले आहेत. १ हजार ५२५ ट्रान्सफॉर्मरही बंद आहेत. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. सर्व जिल्हा प्रशासनांना अडचणीच्या ठिकाणी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

धमकी आलेला ‘तो’ नंबर पाकिस्तानमधल्या इम्तियाजचा

मुंबई मे हमला होने जा रहा है, २६-११ की याद दिलाएगा

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

‘फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू’

दरम्यान, सिमला हवामान केंद्राने दोन दिवस तिथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यूपीमध्ये गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा