…मानखुर्द येथील बालगृहाला करण्यात आले सील

…मानखुर्द येथील बालगृहाला करण्यात आले सील

मानखुर्द येथील ‘चेंबूर चिल्ड्रेन्स होम’ या बालगृहाला सध्या सील करण्यात आले आहे.

या बालगृहातील १८ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्व मुलांचे वाशी नाका येथील कोविड केंद्रात विलगीकरण करण्यात आले आहे. कोविड केंद्रात या मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. पालिकेने मानखुर्दमधील बालगृह सील केले असून तेथील कर्मचारी वर्गाचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथून एका मुलाला बालगृहात आणण्यात आले होते. सुरुवातीला त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, त्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. दरम्यानच्या काळात त्या मुलामध्ये कोणतीही कोरोनासंबंधी लक्षणे आढळून आली नाहीत. काही दिवसांनी सौम्य लक्षणे दिसताच त्याची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तेव्हाच अजून एका मुलामध्ये काही लक्षणे दिसून येताच त्याचीही चाचणी करण्यात आली. त्याचाही अहवाल पॉझिटीव्ह येताच पालिकेने बालगृहातील १०२ मुलांची कोरोना चाचणी केली. त्यात आतापर्यंत १८ जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे, असे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांनी संकीतले.

हे ही वाचा:

बाळासाहेब गेल्यावर ठाकरी शैलीही संपली!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिक्रमणांचे जंगल

शाळा सुरू करण्यासाठी लसीकरण कशाला हवे?

यंदा विमान तिकीट आरक्षणाची गगनाला गवसणी!

बालगृहातील मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून आवश्यक ती काळजी घेण्यात येते. त्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, वेळोवेळी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. संस्थांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात येत असून. मुलांनाही देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे, असे चिल्ड्रेन एड सोसायटीचे उपमुख्याधिकारी सतीश बनसोडे यांनी सांगितले. मुलांची नियमित तपासणी करण्यात येते. एका मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह येताच सर्वच मुलांची तपासणी करण्यात आली. त्यातील बाधित मुलांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे चिल्ड्रेन चेंबूर होमचे अधीक्षक तुषार बिलावेकर यांनी सांगितले.

लहान मुलांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग होण्याची ही आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. तीन दिवसांपूर्वीच भायकळा येथील बालिका अनाथ आश्रमातील १५ मुलींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.

Exit mobile version