केंद्रीय गुप्तचर विभाग आणि जिल्हा पोलिसांच्या सुरक्षा शाखेने संयुक्त कारवाईत मंगळवारी (१ एप्रिल) हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील जादरा गावात असलेल्या एका वीटभट्टीवर छापा टाकला आणि १८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये पाच पुरुष, सहा महिला आणि सात मुले आहेत. आरोपींकडून चार मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.
रेवाडीत पकडलेले बांगलादेशी एका एजंटमार्फत पश्चिम बंगालच्या न्यू कूचबिहार सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे भारतात घुसले होते. यापैकी एकाच कुटुंबातील सहा सदस्य २० वर्षांहून अधिक काळ रेवाडी जिल्ह्यात राहत होते. आरोपींना रामपुरा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुप्तचर विभागाला माहिती मिळाली होती की बांगलादेशी नागरिक जादरा गावातील प्रजापती वीटभट्टीवर अनेक वर्षांपासून राहत आहेत. माहिती मिळाल्यानंतर, गुप्तचर विभागाच्या पथकाने सुरक्षा शाखेसह दुपारी भट्टीवर छापा टाकला आणि तेथे अनेक बांगलादेशी काम करत असल्याचे आढळले. बांगलादेशातील कुडीग्राम जिल्ह्यातील रहिवासी असलेले रफिक उल, अझीज उल आणि अफझलसह १८ जणांना अटक करण्यात आली.
हे ही वाचा :
चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चिनी चापट…
‘रस्ते वाहतुकीसाठी आहेत, प्रार्थनेसाठी नाहीत’, हिंदूंकडून शिस्त शिका!
‘राज्याचे नाट्यगृहधोरण दोन महिन्यात येणार’
…आणि अनंत अंबानींनी कोंबड्याच दुप्पट किमतीने विकत घेतल्या!
रफिक उलची चौकशी केली असता, तो २० वर्षांपासून जिल्ह्यात राहत असल्याचे उघड झाले, तर अफजलसह उर्वरित लोक दोन-तीन वर्षांपूर्वी एजंटांमार्फत बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले होते. रामपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी मनीष कुमार म्हणाले की, ही कारवाई गुप्तचर विभाग आणि सुरक्षा शाखेने संयुक्तपणे केली. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई सुरू आहे.