26 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेष१८-४४ वयोगटाला आता लसीसाठी नोंदणीची गरज नाही

१८-४४ वयोगटाला आता लसीसाठी नोंदणीची गरज नाही

Google News Follow

Related

आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. त्यामुळे कोविन ऍपवर  नाव नोंदणी करून अपॉईंटमेट घेण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. केंद्र सरकारने नवे नियम जारी केले असून त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तिंना लसीकरणासाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. दरम्यान, त्यांना Cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

रोज लस देण्याची वेळ संपेल आणि शेवटी ज्या लस उपलब्ध राहतील त्या ऑनसाईट व्यवस्थेनुसार लोकांना दिल्या जातील. त्यामुळे लस वाया जाणार नाहीत. त्याचा उल्लेख कोविन प्लॅटफॉर्मवर केला जाणार आहे. ही नवीन सुविधा केवळ व्हॅक्सिनेशन सेंटरवरच असेल. अनेकदा व्हॅक्सिनचा स्लॉट बुक केल्यानंतरही अनेक लोक व्हॅक्सिन घेण्यासाठी सेंटरवर येत नाही. त्यामुळे लस वाया जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांची टीका हा निव्वळ पोरखेळ

चीननेच बनवला हा ‘वूहान वायरस’

देशात पाच हजार पेक्षा जास्त काळ्या बुरशीचे रुग्ण

वडेट्टीवारांना ओबीसी नेता होण्याची घाई, त्यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ वर गेला आहे. देशात २ कोटी ३७ लाख २८ हजार ११ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ३ हजार ७२० रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर २७ लाख २० हजार ७१६ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १९ कोटी ६० लाख ५१ हजार ९६२ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा