दक्षिण कोरियाच्या विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू!

धावपट्टीवरून घसरल्याने झाला अपघात

दक्षिण कोरियाच्या विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू!

दक्षिण कोरियात एक विमान विमान कोसळून मोठा अपघात झाला आहे. दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (२८ डिसेंबर) हा अपघात झाला. विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने विमानाला आग लागली. या दुर्घटनेत यामुळे १७९ जणांचा मृत्यू झाला. माहिती देताना स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेजू एअरचे विमान मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि अपघात झाला.

थायलंडमधील बँकॉक येथून निघालेले बोईंग ७३७-८०० जेट हे विमान धावपट्टीवरून घसरले. विमानात १७५ प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट्स असे एकूण १८१ जण होते. लँडिंग दरम्यान ते क्रॅश झाले. दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापच्या वृत्तानुसार, पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानाच्या लँडिंग गिअरवर परिणाम झाला असावा. त्यामुळे लँडिंग गिअर फुटल्याने आग लागली.

योनहॅपच्या रिपोर्टनुसार, लँडिंग गियर निकामी झाल्यानंतर पायलटने थेट विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचा वेग कमी करता आला नाही आणि विमान धावपट्टीच्या शेवटच्या टोकाला पोहोचले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते विमानतळाच्या शेवटी असलेल्या कुंपणाला आदळले आणि विमानाला आग लागली. दुर्घटनेत १७९ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, १७५ प्रवाशांपैकी १७३ कोरियन नागरिक आहेत. तर २ थाई नागरिक होते.

हे ही वाचा : 

ज्वेलर्स मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या कटात संपादक 

अझरबैजानच्या विमान अपघाताबद्दल पुतीन यांनी मागितली माफी

भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाणांची नियुक्ती!

‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला सोलापुरातून प्रारंभ!

 

Exit mobile version