महाराष्ट्रातील कैद्यांची आता चंगी, कैद्यांना मिळणार पाणीपुरी, आईस्क्रीम!

महाराष्ट्र कारागृह विभागाने कैद्यांसाठी कॅन्टीनच्या वस्तूंच्या यादीत केली सुधारणा

महाराष्ट्रातील कैद्यांची आता चंगी, कैद्यांना मिळणार पाणीपुरी, आईस्क्रीम!

महाराष्ट्र कारागृह विभागाने अलीकडेच कारागृहातील कॅन्टीनमधून कैद्यांना खरेदी करता येणार्‍या वस्तूंच्या यादीत सुधारणा केली आहे. कैद्यांना जीवनावश्यक आणि मनोरंजनाच्या वस्तूंचे मिश्रण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कॅन्टीन कॅटलॉगमध्ये एकूण १७३ वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये बर्म्युडा शॉर्ट्स आणि टी-शर्ट आणि चाट मसाला, लोणचे, नारळपाणी, चेस बोर्ड, ओट्स, कॉफी पावडर, लोणावळा चिक्की, शुगर फ्री स्वीटनर्स, आइस्क्रीम, सेंद्रिय फळे यांचा या यादीतील लक्षणीय समावेश आहे.तसेच पीनट बटर, पाणीपुरी, कला पुस्तके, रंगीत वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.चेहरा धुण्यासाठी फेश वॉश, केसांना रंग इत्यादी वैयक्तिक वस्तूही जोडण्यात आल्या आहेत.तसेच तंबाखूची तीव्र इच्छा शांत करण्यासाठी, निकोटीन-आधारित गोळ्यांना देखील परवानगी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांना हवं होतं मंत्रिपद; पण भाजपाचा नकार

‘हमासचा निःपात करण्याची शपथ घेतली आहे, ती पूर्ण करूच’

पोयसर नदी रुंदीकरणातील बाधितांना याच परिसरात मिळाली घरे!

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला मिनिबस धडकली, आठ ठार!

एडीजीपी (तुरुंग) अमिताभ गुप्ता यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “निर्बंधांमुळे कैद्यांची मनःस्थिती बदलते.नियमांचे पालन करून कैद्यांचे मानसिक आरोग्य चांगले तयार करून त्यांना सुधारले जाऊ शकते.ते पुढे म्हणाले, कैद्यांनी आपल्या खाण्या-पिण्यात बदल केला पाहिजे.ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहील आणि ते आपल्या व्यवहारांमध्ये सुधारणा आणू शकतील, असे अमिताभ गुप्ता म्हणाले.

 

Exit mobile version