म्यानमारमध्ये सोमवारी पहाटे २.८ ते ७.५ तीव्रतेचे भूकंपाचे ३६ धक्के जाणवले, अशी माहिती देशाच्या हवामान आणि जलविज्ञान विभागाने दिली आहे. हे धक्के शुक्रवारी दुपारी १२.५१ वाजता आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर जाणवले. म्यानमारच्या राज्य प्रशासन परिषदेनं सांगितलं की, या भूकंपात सुमारे १,७०० लोकांचा मृत्यू झाला, ३,४०० जण जखमी झाले आणि ३०० लोक बेपत्ता आहेत.
मांडले प्रदेशात शुक्रवारी ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप आला. काही मिनिटांनंतरच ६.४ तीव्रतेचा दुसरा धक्का बसला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले. या भूकंपाने म्यानमारसह थायलंडमध्येही मोठी हानी केली. त्याचे धक्के चीन, बांगलादेश आणि भारतातही जाणवले. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले की, १० लोक मृत्युमुखी, ४२ जण जखमी आणि ७८ लोक बेपत्ता आहेत.
हेही वाचा..
व्हायरल गर्ल मोनालिसाला ऑफर देणारा दिग्दर्शक निघाला बलात्कारी
दलाई लामा ‘गोल्ड मर्क्युरी पुरस्कार २०२५’ने सन्मानित
मोदींकडे भारतासाठीचा हजार वर्षांचा दृष्टीकोन!
नमाजावेळी काळी पट्टी बंधणाऱ्यावर काय म्हणाले हुसेन ?
थायलंडचे पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांनी बँकॉकमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. भूकंपाचे केंद्र १.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या मांडले शहरापासून फक्त २० किमी अंतरावर होते. सागाइंग, मांडले, मॅगवे, शान राज्याच्या ईशान्य भाग, ने पी ताव आणि बागो प्रदेशात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून, आंतरराष्ट्रीय मदतीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
मांडले आणि यांगूनला जोडणाऱ्या अनेक प्रमुख रस्त्यांचे नुकसान झाले आणि ते अडथळ्यांमुळे बंद करण्यात आले. मांडले आणि ने पी ताव येथील विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले असून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या प्रतिमा आणि व्हिडिओंमध्ये मांडले भागातील इमारती, मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांचे मोठे नुकसान झाले असल्याचे दिसत आहे. मांडले पॅलेस आणि महामुनी पॅगोडाला देखील मोठी हानी पोहोचली आहे.
म्यानमारमध्ये भूकंपानंतर काही तासांतच भारताने बचावकार्य व मानवी मदत पोहोचवली. भारताने बचाव पथके पाठवली आणि आपत्तीग्रस्त भागांना त्वरित मदत पुरवली.