लालूप्रसाद यादव यांना त्यांच्या मुलीने किडनी दिल्याची घटना ताजी असताना अशाच आणखी एका घटनेने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्रिसूर जिल्ह्यातली ही घटना आहे. त्या घटनेमुळे त्या मुलीचे सर्वत्र कौतुक होते आहे.
यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांना त्यांची मुलगी आपल्या यकृताचा तुकडा देणार आहे. आपल्या यकृताचे काही भाग त्याची १७ वर्षीय मुलगी त्याच्यासाठी करणार आहे. केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच तिच्या यकृताचा काही भाग वडिलांना दान करण्याची परवानगी दिली.
त्रिशूर जिल्ह्यातील कोलाझी येथील रहिवासी असलेले पीजी प्रथमेश हे यकृताच्या आजाराशी झुंज देत आहेत ज्याला डिकम्पेन्सेटेड क्रॉनिक लिव्हर डिसीज म्हणतात. वडिलांच्या दीर्घकालीन यकृताच्या आजारावर एकमात्र इलाज म्हणून डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण हाच सल्ला दिला होता. कुटुंबातील एकही सदस्य प्रत्यारोपणासाठी जुळत नसल्याने त्याची मुलगी देवनंदाने तिचे यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. देवनंदाने तिच्या वडिलांसाठी केलेल्या अथक लढ्याला अखेर यश आले आहे. तिच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या लढ्याचे कोर्टानेही कौतुक केले.
हे ही वाचा:
सर्कसचा तंबू गुंडाळण्याच्या मार्गावर
कोरोनामुळे अचानक येतो का हृदयविकाराचा झटका?
९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश
साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’
त्याबाबत तज्ज्ञ समितीने एक अहवाल दाखल केला होता. अहवालात असे म्हटले आहे की देवनंदा यांना तिच्या निर्णयाच्या परिणामांची पूर्ण जाणीव होती. तिने न्यायालयाला विनंती केली की “लवकरच मी १८ वर्षांची होणार आहे. त्यामुळे कृपया माझी याचिका नाकारू नका आणि प्रत्यारोपणाला परवानगी द्या “. देवानंद यांचे अभिनंदन करताना, न्यायमूर्ती व्हीजी अरुण यांनी सांगितले की, तिच्यासारखी मुलगी असल्यामुळे तिचे पालक भाग्यवान आहेत.