26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषमिझोराममध्ये रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू

मिझोराममध्ये रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू

ढिगाऱ्याखाली ३० ते ४० मजूर अडकल्याची शक्यता

Google News Follow

Related

मिझोरामची राजधानी ऐजॉलजवळ निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवार, २३ ऑगस्ट रोजी निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून झालेल्या अपघातात १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, ढिगाऱ्याखाली अजूनही ३० ते ४० मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, असंही सांगितलं जात आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैरांगमध्ये पुलाचे बांधकाम सुरू होते. यावेळी त्या ठिकाणी ३५ ते ४० कामगार कार्यरत होते. बैराबी आणि सायरंग यांना जोडण्यासाठी कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. जमिनीपासून पुलाची लांबी ३४१ फूट आहे. या पुलाचे एकूण चार पिलर्स असून पूलाचे बांधकाम सुरू असताना तिसऱ्या आणि चौथ्या पिलरवरील गर्डर तुटून खाली पडला. गर्डर कोसळून सुमारे १७ मजूर मृत्यूमुखी पडले आहेत.

घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री जोराम थांगा यांनी अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून प्रशासन मदत कार्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसचे जखमींच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

हे ही वाचा:

‘भारत होईल अवघ्या विश्वाच्या विकासाचे इंजिन’

अँटिलिया स्फोटके, मनसुख हत्याकांड प्रकरणी प्रदीप शर्माला जामीन मंजूर

इटलीत नोकरी देतो सांगितले; पण लिबियात सशस्त्र गटाच्या तावडीत सापडले

मतदानासाठी सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांसाठी मदतीची घोषणा केली आहे. “ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी मी प्रार्थना करतो,” अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. “या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे,” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा