ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कदायक प्रकार रुग्णालयात घडला आहे. यापूर्वीही शुक्रवारी याचं रुग्णालयात उपचार न मिळाल्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता.
मृत्यू झालेले १७ पैकी १३ रुग्ण हे आयसीयूमधील होते तर चार रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. रुग्णांच्या मृत्यूच्या वृत्ताला रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने तर काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नसून रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.
सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. याआधी १० ऑगस्ट रोजी एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. आता केवळ रात्री १०.३० पासून सकाळी ८.३० पर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.
हे ही वाचा:
भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर चौथ्यांदा कोरले नाव
राज्यात ह्युंदाई कंपनी चार हजार कोटींची गुंतवणूक करणार
‘मणिपूर हिंसाचारावर लष्कर हा तोडगा नाही’
त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!
या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली असून दरम्यान काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले होते.