भाडेवाढीतून एसटीला मिळणार इतके कोटी

भाडेवाढीतून एसटीला मिळणार इतके कोटी

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यामध्ये आज रात्रीपासून एसटी बसचे भाडे वाढविण्यात आले आहे. राज्य सरकारने १७ टक्के भाडे वाढवले असून, डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य संचालित वाहतूक उपक्रमाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, कोरोनाव्हायरस महामारी आणि लॉकडाऊन दरम्यान ऑपरेशन्सच्या अभावामुळे एमएसआरटीसीला मोठा फटका बसला आहे. भाडेवाढीच्या निर्णयामुळे एसटीला अतिरिक्त ५० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, आम्ही डिझेलच्या किमती वाढल्यामुळे सुमारे १७ टक्क्यांनी भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित भाडे आज मध्यरात्रीपासून लागू होईल.

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ यांनी तीन वर्षांच्या अंतरानंतर बसचे भाडे वाढवले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य परिवहन प्राधिकरणाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत एमएसआरटीसीच्या भाडेवाढीला मान्यता दिली आहे. एसटीकडे ९५ हजार कर्मचारी आणि १८ हजार बसेसचा ताफा आहे. एसटीला आत्तापर्यंत १२ हजार ५०० कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. शिवाय कोट्यवधींची देणी सुद्धा बाकी आहेत. मुख्य म्हणजे एसटी कर्मचारी १२ तास काम करूनही त्यांचे वेतनही वेळेवर होत नाही. या सर्वावर उपाय म्हणूनच आता एसटी भाडेवाढ करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा:

५०० वर्षांपूर्वी धर्मगुरूने सांगितले होते, इंडोनेशियात पुन्हा हिंदूंचा प्रभाव येणार…

मजुरी करा, गहू घ्या- तालिबानची ऑफर

सुदानमध्ये लष्करी उठाव?

हा ढोंगीपणा का? सगळं ज्ञान दिवाळीलाच का आठवतं

दिवाळीच्या सुट्टीच्या काळात गावी जाण्यासाठी अनेकजण एसटीचा पर्याय निवडतात. अशा सर्व वातावरणामध्ये सध्या झालेली ही भाडेवाढ म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाळा भूर्दंड आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा दिलेला होता. त्याचबरोबर १७ संघटनांचा सहभाग असलेल्या संयुक्त कृती समितीनं एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते व थकबाकी द्या,अन्यथा बेमुदत उपोषण करु असा इशारा सरकारला दिला आहे.

Exit mobile version