छत्तीसगडमधील कावर्धा भागात सोमवारी (२० मे) पिकअप वाहन खड्ड्यात पडल्याने मोठा अपघात झाला आहे.पिकअप वाहन खड्ड्यात पडल्याने सुमारे १९ जणांचा मृत्यू झाला असून १० हुन अधिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप कारमध्ये एकूण ३६ जण प्रवास करत होते.हे सर्वजण तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते आणि कामावरून परतत असताना हा अपघात झाला आहे.
या संदर्भात माहिति देताना कबिरधामचे एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, कुकडूर पोलीस स्टेशन हद्दीतील बहपनी परिसरात हा अपघात झाला. सुमारे ३६ जण प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह पिकअप थेट खड्डयात पडली. हे सर्व लोक तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते आणि कामावरून परतत असताना हा अपघात झाला.दरम्यान, या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून १० जण जखमी झाल्याची माहिती आहे.जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.हे सर्व कुई येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
शांतिगिरी महाराजांनी मतदान कक्षाला घातला हार, गुन्हा दाखल!
अहमदाबाद विमानतळावर इसिसशी संबंधित श्रीलंकन नागरिकांच्या मुसक्या आवळल्या
‘इंडी आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रम असल्यामुळे मतटक्का घसरला!’
भारत इराणच्या पाठीशी, राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त!
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.अपघाताची माहिती मिळविण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.अपघाताची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे.