१६ जानेवारी हा ” राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस ” म्हणून साजरा केला जाणार आहे. आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आज दीडशेहून अधिक स्टार्टअप्सशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.
स्टार्टअप्सशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, “ स्टार्ट-अप्स हा भारताचा कणा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा स्टार्ट अप्सची भूमिका महत्त्वाची असेल. देशाचे नवकल्पक देशाचा जागतिक स्तरावर गौरव करत आहेत. २०१६ मध्ये स्टार्टअप इंडिया या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यादिवसापासून सरकारने स्टार्टअपच्या वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्यावर काम केले आहे. ”
अमृत महोत्सव हा “सेलिब्रेटिंग इनोव्हेशन इकोसिस्टम” हा एक आठवडाभर चालणारा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम १० ते १६ जानेवारी दरम्यान वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या विकासासाठी विभागाकडून आयोजित केला जात आहे. असे एएनआय ने वृत्त दिले आहे.
हे ही वाचा:
पहिल्या तीन महिन्यात जाहिरातींसाठी राज्य सरकार खर्च करणार १६ कोटी
मुंबई महापालिकेत जाधव, चहल, वेलारसु यांची ‘वाझेगिरी
ब्रिटनची धुरा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या हाती?
प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; शेलारांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती
देशातील स्टार्टअप वातावरणाला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टार्टअपशी संवाद साधला आहे. यामध्ये कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी झाले होते.
या स्टार्टअप्सची सहा कार्यकारी गटांमध्ये विभागणी केली गेली आहे. प्रत्येक गटाने त्यांना दिलेल्या संकल्पनेवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण केले. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश आहे.