27 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
घरविशेष‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत महिन्याभरात १६३ मुले पुन्हा कुटुंबीयांकडे परतली!

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत महिन्याभरात १६३ मुले पुन्हा कुटुंबीयांकडे परतली!

मध्य रेल्वे आरपीएफची कौतुकास्पद कामगिरी

Google News Follow

Related

मध्य रेल्वे आरपीएफने कौतुकास्पद कामगिरी करत महिन्याभरात दीडशेहून अधिक हरवलेल्या बालकांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत आरपीएफ जवान लहान मुलांना वाचवण्याची जबाबदारीही पार पाडत असतात.

या अंतर्गत सुटका करण्यात आलेल्या १६३ मुलांमध्ये १३३ मुले आणि ३० मुलींचा समावेश असून त्यांना चाईल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडण्यात आले आहे. मध्य रेल्वे आरपीएफने मे महिन्यात १६३ मुलांना शोधून काढण्याची कामगिरी केली आहे.

अनेकदा लहान मुळे काही भांडणामुळे, कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन, शहराकडची ओढ या कारणांमुळे घर सोडून रेल्वे स्थानक गाठतात. अशा मुलांना आरपीएफ जवान शोधून काढून त्यांच्या समस्या समजून घेतात. त्यांना त्यांच्या पालकांसह पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. आता ही १६३ मुले परतल्यानंतर  रेल्वेच्या या कामगिरीबद्दल पालक त्यांचे आभार व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा:

तुमचाही दाभोलकर होणार; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

निर्मला सितारामन यांच्या मुलीचा अत्यंत साधेपणाने विवाह

लोकसभा निवडणुकीआधी एनडीएचे बळ वाढणार

मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये का शिजवले? आरोपी मनोजने सांगितले कारण

सुटका करण्यात आलेल्या मुलांची विभागनिहाय आकडेवारी

  • मुंबई विभाग- ३४ मुले (२३ मुले आणि ११ मुली)
  • भुसावळ विभाग- ७८ मुले (७० मुले व ८ मुली)
  • नागपूर विभाग- १४ मुले (५ मुले आणि ९ मुली)
  • सोलापूर विभाग- ४ मुले (२ मुले व २ मुली)
  • पुणे विभाग- ३३ मुले (३३ मुले)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा