28 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषकंटेनर चालकाचे हातपाय बांधले आणि चक्क 'ऍपल' फोन पळवले !

कंटेनर चालकाचे हातपाय बांधले आणि चक्क ‘ऍपल’ फोन पळवले !

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. लखनाडोन-झाशी महामार्गावर चोरट्यांनी कंटेनर चालकाचे हातपाय बांधून ट्रकमध्ये भरलेले १२ कोटी रुपये किमतीचे ॲपल कंपनीचे मोबाईल लंपास केले आहेत. चोरीची तक्रार देण्यासाठी कंटेनर चालकाने बंदरी पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारल्या, मात्र १५ दिवस उलटूनही तक्रार लिहून घेतली न्हवती. अखेर हे प्रकरण आयजी प्रमोद वर्मा यांच्यापर्यंत पोहोचले. यानंतर आयजी प्रमोद वर्मा यांनी स्वत: बंदरी पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणात निष्काळजी केल्यामुळे हेड कॉन्स्टेबल राजेश पांडे याला निलंबित करण्यात आले आहे.

१४ ऑगस्ट रोजी ॲपल कंपनीचे किमतीय मोबाईल घेवून एक कंटेनर (UP १४ PT ०१०३) हैदराबादहून दिल्लीला निघाला होता. कंटेनर चालकासह एक सुरक्षा रक्षक गाडीत होता आणि दुसरा सुरक्षा रक्षक लखनाडोन येथून चढणार होता. त्यानंतर लखनाडोन जवळ सुरक्षा रक्षकाने चहा पिण्याचा बहाणा करून कंटेनर थांबवला आणि तेथे पहिल्या पासून उपस्थितीत उभा असलेल्या अन्य व्यक्तीला चालकासोबत ओळख करून देत, हा सुरक्षा रक्षक असून आपल्या सोबत येणार असल्याचे गाडीतल्या सुरक्षा रक्षकाने सांगितले. यानंतर ट्रकचालक दोन्ही सुरक्षा रक्षकांसह निघून गेला.

हे ही वाचा :

इंडिगो विमानात कागदाच्या तुकड्यावर लिहिली होती बॉम्बची धमकी !

अर्णब गोस्वामीप्रमाणे बंगालमध्येही पत्रकाराची मुस्कटदाबी?

उद्धव ठाकरेंना दोन वर्षांपूर्वीच जनतेने गेट आउट केलंय !

महाराजांनी सुरत लुटलीच नाही, पण कॉंग्रेसने तसं शिकवलं !

काही वेळानंतर चालकाला झोप येवू लागल्याने सुरक्षा रक्षकांनी रस्त्याच्या कडेला गाडी घेवून थोडे आराम करण्यास सांगितले. त्यानंतर चालकाने कंटेनर रस्त्याच्या कडेला घेत केबिनमध्ये झोपून गेला. दुसऱ्या दिवशी (१५ ऑगस्ट) कंटेनर चालकाला जागा आली तेव्हा त्याचे हात-पाय बांधले होते, त्याने आपली सुटका केली तेव्हा तो लखनाडोन-झाशी महामार्गावरील बंदरी परिसरात होता. त्याने बाहेर येवून पाहताच कंटेनरचे दोन्ही दरवाजे उघडे होते आणि गाडीतील तब्बल १६०० ॲपल आयफोन गायब होते, तसेच गाडीतील दोन्ही सुरक्षा रक्षकही गायब होते. चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत १२ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे. दरम्यान, आयजी प्रमोद वर्मा यांनी या प्रकरणाची दखल घेत तक्रार नोंदवून आरोपींच्या शोधासाठी पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. आरोपींचा शोध सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा