आयआयटी मुंबईला अज्ञात व्यक्तीकडून १६० कोटींची देणगी

माजी विद्यार्थी असल्याची शक्यता

आयआयटी मुंबईला अज्ञात व्यक्तीकडून १६० कोटींची देणगी

मुंबईतील आयआयटी संस्था मोठी देणगी मिळाल्यामुळे चर्चेत आली आहे. आयआयटी मुंबई या संस्थेला एका अज्ञात व्यक्तीकडून तब्बल १६० कोटी रूपयांची देणगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आयआयटी मुंबई या शैक्षणिक संस्थेला देणगी देणाऱ्यांचा आकडा मोठा असतो.

शैक्षणिक संस्थेला तब्बल १६० कोटी रुपयांची देणगी मिळाली असून देणगी देणाऱ्या व्यक्तीने त्याच्या नावाचा खुलाला केला नाही. त्यामुळे इतकी मोठी रक्कम कोणी दिली या प्रश्न सर्वांना पडत आहे. आयआयटी मुंबईचे संचालक प्रोफेसर सुभासिस चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. अज्ञात देणगीदार संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबईला ३१५ कोटी रुपये दान केले होते. या संस्थेत त्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी ही रक्कम दान केली होती. नंदन नीलेकणी स्वत: याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती.

हे ही वाचा:

नीरज चोप्राचा ‘पॅरिसस्पर्श’; जागतिक स्पर्धेतून ऑलिम्पिकसाठी पात्र

चंद्रावर कसं उतरलं प्रज्ञान रोव्हर?

इस्रोचे पुढील लक्ष्य ‘आदित्य -एल १’

मध्य प्रदेशात ‘हिंदुत्वा’च्या अजेंड्यामुळे काँग्रेसमध्ये कलह

दरम्यान, जेव्हा अज्ञात व्यक्ती १६० कोटी रुपयांची देणगी देतो तेव्हा ही सर्वांसाठी आश्चर्याची आणि अनोखी घटना ठरते. ही रक्कम ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबिलिटी रिसर्च हबच्या स्थापनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती सुभासिस चौधरी यांनी दिली आहे.

Exit mobile version