हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून १६ प्रवाशांचा मृत्यू

हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून १६ प्रवाशांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमधील कुलू जिल्ह्यात आज, ४ जुलै रोजी भीषण अपघात झाला. सकाळी ही बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. या बसमध्ये शाळकरी विद्यार्थीही होते. या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. यातील काही शाळकरी विद्यार्थ्यांसह १६ जणांचा मृत्य झाला आहे.

सैंज घाटीतून शैशर शहराकडे ही बस येत होती. या दरम्यान एका वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. या बसमध्ये काही स्थानिक प्रवाशांसह शाळेतील विद्यार्थी होते. ही बस जावळा गावापासून २०० मीटर दूर असताना दरीत कोसळली. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला असून बसचे ड्रायव्हर, कंडक्टर गंभीर जखमी झाले आहेत. बस खोल दरीत कोसळल्याने बस पूर्ण चक्काचूर झाली आहे. पोलिस यंत्रणेने आणि जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

हे ही वाचा:

संतोष बांगर एकनाथ शिंदेंसोबत विधानसभेत रवाना

कर्नाटकची सिनी शेट्टी बनली ‘मिस इंडिया २०२२’

डेन्मार्कमधील मॉलमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना धक्का; गटनेते एकनाथ शिंदे, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना मान्यता

हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या बस अपघाताच्या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. “हिमाचल प्रदेशातील कुलू येथे झालेला बस अपघात हृदय हेलावणारा आहे. या दु:खद प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांसोबत आहे. मला आशा आहे की, जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे होतील. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे.” या अपघातात मृत झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना २ लाखांची आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तर, जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Exit mobile version