25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषआजपासून १५ वी लक्ष्य कप नेमबाजी स्पर्धा

आजपासून १५ वी लक्ष्य कप नेमबाजी स्पर्धा

सुमा शिरूर यांच्या नेरळमधील अकादमीची स्पर्धा

Google News Follow

Related

भारताच्या होतकरू एअर रायफल नेमबाजांना १५ व्या आरआर लक्ष्य कप २०२४ मध्ये जोरदार स्पर्धा करताना पाहायला मिळेल. आरआर ग्लोबल प्रायोजित हा स्पर्धा ४ आणि ५ जानेवारी २०२५ रोजी पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे स्थित अत्याधुनिक लक्ष्य शूटिंग क्लबमध्ये होणार आहे. राष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेतील सध्याचे पुरुष आणि महिला विजेते शाहू माने (लक्ष्य शूटिंग क्लबचे माजी विद्यार्थी) आणि अनन्या नायडू हे १५ व्या आरआर लक्ष्य कपमध्ये विजेतेपदासाठी स्पर्धा करतील. तसेच, दिव्यांश सिंग पंवर, अर्जुन बबुता आणि संदीप सिंग यांसारखे नामांकित ऑलिम्पियनसुद्धा या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे लंडन ऑलिम्पिक २०१२ चे कांस्य पदक विजेते आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी भारतीय संघाचे चे प्रमुख शेफ- दी-मिशन गगन नारंग असतील.

लक्ष्य शूटिंग क्लबतर्फे आयोजित ही वार्षिक निमंत्रित स्पर्धा ऑलिम्पियन, अर्जुन पुरस्कार विजेती आणि ‘द्रोणाचार्य’ सन्मानित सुमा शिरूर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. ही स्पर्धा सातत्याने आपली प्रतिष्ठा वाढवत असून नेमबाजांच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलत आहे. लक्ष्य शूटिंग क्लबच्या हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सुमा शिरूर म्हणाल्या की, “आरआर लक्ष्य कपमध्ये आमचा उद्देश कौशल्य ओळखणे, उत्कृष्टतेला सन्मान देणे आणि नेमबाजांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी सर्वोच्च व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून, ती मेहनतीचा, समर्पणाचा आणि खेळाडूवृत्तीचा उत्सव आहे.”

आरआर ग्लोबलचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र काबरा म्हणाले की, “आरआर ग्लोबलमध्ये आम्ही भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी लक्ष्य शूटिंग क्लबचे योगदान ओळखतो आणि २०१७ पासून आरआर लक्ष्य कपचे अभिमानाने समर्थन करत आहोत. ‘द्रोणाचार्य’ सुमा शिरूर यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सीएसआर भागीदारीतून भारतीय क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी आमची वचनबद्धता कायम आहे.”

आरआर लक्ष्य कप ही केवळ निमंत्रण-आधारित स्पर्धा असून, भारतातील अव्वल २० एअर रायफल नेमबाजांचे कौशल्य प्रदर्शित करणारी उत्कृष्ट स्पर्धा आहे. या स्पर्धेचे विशेषत्व म्हणजे येथे पुरुष आणि महिला समान संख्येने शॉट्स घेत स्पर्धा करतात. २००८ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत हा नियम लागू आहे.

यापूर्वी या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी झालेल्या नेमबाजांमध्ये प्रमुखतः पुढील नावांचा समावेश आहे:

  • श्रियांका सदंगी (१३वी आरआर लक्ष्य कप २०२२ विजेती, पॅरिस २०२४ साठी कोटा विजेती)
  • रुद्रांक्ष पाटील (२०२१ चा विजेता, ISSF प्रेसिडेंट कप विजेता)
  • दिव्यांश सिंग पंवर (२०१८ चा विजेता, ऑलिम्पियन)
  • ऐश्वर्य प्रताप तोमर (२०१९ चा विजेता, ऑलिम्पियन)
  • किरण जाधव (एशियन एअरगन चॅम्पियनशिप २०२२ रौप्यपदक विजेता)

हे ही वाचा : 

सिडनी कसोटीत न खेळणाऱ्या रोहित शर्माने अखेर घेतला निर्णय!

मराठी भाषेत बोलण्याची विनंती करणाऱ्या तरुणाला माफी मागण्यास भाग पाडणाऱ्यांविरोधात गुन्हा

दिल्ली झाली ‘गायब’, धुक्यामुळे दिसेनासे झाले

हिंदू साधू चिन्मय दास प्रकरणाची निष्पक्ष चाचपणी व्हावी

ज्युनियर फायनल ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता होईल, तर वरिष्ठ गटाची फायनल ३:३० वाजता होईल. पारितोषिक वितरण सायंकाळी ५:३० वाजता होणार आहे. लक्ष्य शूटिंग क्लब प्रेक्षकांना नेमबाजांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडाक्षेत्राला चालना देण्यासाठी आमंत्रित करत आहे. १५ व्या आरआर लक्ष्य कप स्पर्धेच्या माहितीसाठी लक्ष्य शूटिंग क्लबच्या यूट्यूब (@lakshyashootingclub6674) आणि इंस्टाग्राम (@lakshyashooting) प्लॅटफॉर्मवर पाहता येतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा