म्यानमार मधून मिझोराममध्ये पोहचलेल्या १५१ सैनिकांना भारताचा आधार!

भारतात आलेले सैनिक सुरक्षित असून लवकरच त्यांच्या देशात पाठवले जाणार

म्यानमार मधून मिझोराममध्ये पोहचलेल्या १५१ सैनिकांना भारताचा आधार!

म्यानमारमधील “अरकान” या सशस्त्र जातीय गटाने लष्करी छावण्या ताब्यात घेतल्यानंतर म्यानमार मधील १५१ सैनिक आपला जीव वाचवण्यासाठी मिझोरामच्या लांगतलाई जिल्ह्यात पळून गेले.त्यांनी आसाम रायफल्सची मदत घेतली. यानंतर त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.म्यानमारच्या लष्करी सैनिकांना ‘तत्मादव’ म्हणूनही ओळखले जाते.

आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी (३० डिसेंबर) ही माहिती दिली. ते म्हणाले की, या सैनिकांची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली असून, त्यानंतर त्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी (२९ डिसेंबर) आंतरराष्ट्रीय सीमेजवळील त्यांचे तळ अरकान आर्मीच्या सैनिकांनी ताब्यात घेतले. यानंतर म्यानमार आर्मीचे सैनिक शस्त्रे घेऊन पळून गेले आणि लांगतलाई जिल्ह्यातील तुइसांतलांगमध्ये आसाम रायफल्समध्ये पोहोचले. अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून भारतीय सीमेजवळील भागात म्यानमार आर्मी आणि अरकान आर्मीच्या सैनिकांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.

हे ही वाचा:

जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता

इम्रान खान निवडणूक लढण्यास अपात्र

‘सर्व निर्णय घेताना प्रथम असते फक्त राष्ट्रहित’!

३१ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सापडला जाळ्यात!

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या काळात मिझोराममध्ये घुसलेले म्यानमार लष्कराचे काही सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. ते म्हणाले की, म्यानमार लष्कराचे सैनिक आता म्यानमार सीमेजवळील लोंगतलाई जिल्ह्यातील पर्व येथे आसाम रायफल्सच्या सुरक्षित कोठडीत आहेत.पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ,आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अरकान हल्ल्यानंतर भारतात पळून गेलेल्या या सैनिकांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांना लवकरच त्यांच्या देशात परत पाठवण्यात येणार आहे. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारचे लष्करी सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे.

Exit mobile version