गाझियाबादमध्ये कब्रस्तानच्या बाजुला सापडले १५० वर्षे जुने शिवलिंग!

हिंदू संघटनांनी आक्षेप घेत पोलिसांकडे केली तक्रार 

गाझियाबादमध्ये कब्रस्तानच्या बाजुला सापडले १५० वर्षे जुने शिवलिंग!

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील कब्रीस्तानच्या कडेला शिवलिंग सापडले आहे. हे शिवलिंग १५० वर्षे जुने असल्याचा दावा केला जात आहे. शिवलिंगाचा शोध घेतल्यानंतर भाविकांनी येथील शिवलिंगाची स्वच्छता केली आणि जलाभिषेकही केला. हे प्रकरण मोदीनगर तहसील परिसरातील आबिदपूर मानकी गावाशी संबंधित आहे.

शिवलिंग सापडल्यानंतर हिंदू संघटनांनी आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली. हिंदू संघटनांनी आरोप केला आहे की, शिवलिंग मजारच्या भिंतीमध्ये कैद केले जात आहे. तसेच शिवलिंगासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी हिंदू युवा वाहिनीने केली आहे. या मागणीबाबत हिंदू संघटनांच्या लोकांनी मोदीनगर जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले आहे.

हे ही वाचा :

“पूर्वीच्या बीडच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे पालकमंत्री पद भाड्याने दिले होते”

बँक लुटणारे दोन आरोपी चकमकीत ठार!

गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरशी संबंधित ठाण्यातील फ्लॅट जप्त

बीकेआय प्रतिबंधित दहशतवादी गटाला शस्त्र पुरवठा करणाऱ्याला मुंबईत ठोकल्या बेड्या

८० टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या मानकी गावात शिवलिंगाजवळ जाणूनबुजून मजार बांधण्यात आले असून
ते सीमाभिंतीच्या आत बंदिस्त करण्यात आल्याचा आरोप हिंदू युवा वाहिनी आणि अन्य संघटनांनी मोदीनगर पोलिस ठाण्यात केला. या प्रकरणी हिंदू संघटनांनी पोलिसांत तक्रार दाखल करून मंदिराचे बांधकाम योग्य पद्धतीने करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी पूजा गुप्ता यांनी मीडियाला सांगितले की, “काही दिवसांपूर्वी ही बाब आमच्या निदर्शनास आली. मानकी गावात एक जुने कब्रीस्तान आहे, तिथे एक शिवलिंग आणि शेजारी मजार असल्याचे सांगितले जाते. घटनास्थळी भेट देऊन सखोल तपास करण्यात येणार असून रेकॉर्डची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल. कब्रीस्तान २०-३० वर्षांपेक्षा जास्त जुनी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शिवलिंग आणि मजार ८-१० वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. चौकशीत अशी माहिती मिळाली की, गावातील हिंदू समाज त्या शिवलिंगाची पूजा आणि तेथील साफसफाई करतात.
Exit mobile version