मध्य प्रदेशीतील खरगोनमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून तर २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी हा अपघात झाला असून अपघातातील जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त बस ही सेगाववरून इंदौरच्या दिशेने जात होती. यावेळी बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, खरगोनमधील दसंगा गावाजवळील बोराड नदीवरील पुलावर ही बस पोहोचताच चालकाचे या बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. मात्र, कठडा तुटल्याने ही बस ५० फूट खाली नदीच्या पात्रात कोसळली.
हे ही वाचा:
मान्सूनपूर्वी आणखी पाच चित्ते कुनो अभयारण्यात
“‘सामना’मधील अग्रलेखाला महत्त्व देत नाही”
युद्धाचे ढग गडद! रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला
सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, ‘या’ प्रकरणात केली कारवाई
नदीत पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे, या अपघातात बसचा चालक, कंडक्टर आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू असल्याची माहिती खरगोनचे पोलीस अधीक्षक धरमवीर सिंग यांनी दिली.
Madhya Pradesh | 15 people dead and 25 injured after a bus falls from a bridge in Khargone. Rescue operation underway: Dharam Veer Singh, SP Khargone pic.twitter.com/X66l8Vt7iT
— ANI (@ANI) May 9, 2023
मध्य प्रदेश सरकारडून मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये, गंभीर जमखींना ५० हजार रुपये तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.