पोलीस भरतीच्या संदर्भात अर्ज भरण्याची तारीख १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर फडणवीस यांनी ही माहिती दिली.
आतापर्यंत आमच्याकडे ११ लाख ८० हजार अर्ज आले आहेत. काही ठिकाणांहून सर्व्हर स्लो , पेमेंट गेटवे स्लो असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे १५ दिवस आम्ही अधिकचे देत आहोत त्यामुळे ज्या काही उर्वरित तक्रारी आहेत त्या देखील दूर होतील. नॉन क्रिमिलेअर संदर्भातही काही तक्रारी आल्या होत्या. मागील वर्षीच नॉन क्रिमिलेअर प्रमाण पत्र यावर्षी मिळतं. मागील वार्षिक प्रमाणपत्र यावर्षी दिल्या नंतर ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. तीही अडचण दूर करण्यात आली आहे. भूकंपग्रस्तनाही त्यात समाविष्ट करण्यात आलं आहे.पोलिस भरतीच्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हे ही वाचा :
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७५ हजार पदांच्या भरती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला असून त्याला गती देण्याचे काम केले आहे. आता दर मंत्रिमंडळ बैठकीत ७५ हजार पदे भरण्याच्या संदर्भात कोणत्या विभागाने काय कार्यवाही केली आहे. या संदर्भातील आढावा त्यांना द्यावा लागणार आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.
दिव्यांग कल्याण विभाग ३ डिसेंबरला घोषणा
फडणवीस म्हणाले, दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ डिसेंबरला मुख्यमंत्री त्याची औपचारिक घोषणा करतील.