१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शाळांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.

१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शाळांसाठी मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ‘पीएम श्री स्कूल्स’ (प्राईम मिनिस्टर- स्कूल फॉर रायझिंग इंडिया) योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील १४ हजार ५०० शाळा या अद्ययावत आणि विकसित केल्या जाणार आहेत.

या शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची सर्व उद्दिष्टे दिसणार आहेत. गुणवत्तापूर्ण अध्यापन, अध्ययन आणि संज्ञानात्मक विकास हे या शाळांचे मुख्य उद्देश असतील. तसेच सर्वंकष आणि चौफेर गुणवत्ता असलेले तसेच २१ व्या शतकातील महत्वाची कौशल्ये आत्मसात केलेले युवा या शाळांमधून निर्माण केले जातील, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

लिज ट्रस लवकरच घेणार ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ

अफगाणिस्तानमध्ये रशियन दूतावासाजवळ स्फोट, २० जण ठार

‘उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, धोका देणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे’

‘मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलनातून दिशाभूल केली आता माफी मागा’

या शाळांमध्ये प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग, वाचनालये आणि क्रीडा सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने गेल्या काही काळात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवले आहेत. तसेच, पीएम- श्री शाळा देखील देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना असे शिक्षण देऊन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठे योगदान देतील,” असे नरेंद्र मोदी म्हणाले. या योजनेची घोषणा करताना आनंद होत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version